आपला मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस पाठवा

जकाल जवळपास सर्वजण टच स्क्रिन मोबाईल फोन वापरु लागले आहेत. टच स्क्रिन मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण टच स्क्रिन मोबाईलवर टाईप करणं हे मात्र फारसं सोयीचं आहे असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारच्या मोबाईलवर टाईप करत असताना आपलं बोट थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी आपण टाईप करत असलेला शब्द चुकतो. एखदा दुसरा एसएमएस अशाप्रकारे टाईप करुन पाठवायचा असेल तर ठिक आहे, पण काही लोक आपल्या मोबाईलवर एसएमएस पॅक मारुन एसएमएस चॅट करत असतात. अशा लोकांसाठी मात्र टच स्क्रिन मोबाईलवर लवकर आणि अचूक टाईप करणं ही काहीशी समस्या ठरु शकते.

आपली ही गैरसोय कमी करण्याचा एक उपाय म्हणजे आपला स्मार्टफोन थेट संगणकाशी जोडायचा आणि मग संगणकावरुन आपल्या मोबाईल मार्फत एसएमएस पाठवायचे. आता हे काम अगदी सोप्या पद्धतीने कसे करता येईल? ते आपण पाहूयात. त्यासाठी आपल्याला आपल्या अँड्रॉईड फोनवर एक अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल. या अ‍ॅप्लिकेशनचं नाव आहे MightyText.  हे अ‍ॅप्लिशेकन गूगल प्ले मध्ये मोफत उपलब्ध आहे.
हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते केवळ आपल्या गूगल खात्याशी जोडायचे आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या गूगल खात्याशी जोडून घ्या. त्यानंतर आपल्या संगणकाकडे या. इथे mightytext.net वर जा, लॉगइन वर क्लिक करा आणि आपल्या गूगल खात्याअंतर्गत या साईटमध्ये प्रवेश करा. आपण आपल्या मोबाईलवरील माईटीटेक्स्ट (MightyText) अ‍ॅप्लिकेशन आणि संगणकावरील माईटीटेक्स्ट वेब अ‍ॅप्लिकेशन हे दोन्हीही आता गूगल खाते वापरुन जोडले आहेत. 
आपल्या मोबाईलवर मागील ३० दिवसांत जे एसएमएस आले असतील ते आपणास आता संगणकावर माईटीटेक्स्ट वेब मध्ये दिसू लागले असतील. सेटिंग्जमध्ये जाऊन आपण मागील ६ महिन्यांमधील एसएमएस दिसतील अशी तजवीज करु शकाल. Contacts मध्ये आपणास आपल्या फोनवरील सर्व संपर्क पत्ते दिसतील. इथून आपण एखाद्यास एसएमएस पाठवू शकाल किंवा फोन करु शकाल. आपण फोनवर क्लिक केल्यास आपल्या मोबाईलवरुन तो नंबर आपोआप डायल होईल. यासाठी आपल्या संगणक आणि मोबाईलवर इंटरनेट सुरु असणे मात्र आवश्यक आहे. कारण प्रत्यक्षात इंटरनेटच्या माध्यमातूनच आपला मोबाईल आणि संगणक हे ऐकमेकांशी जोडले गेले आहेत.
मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस
आपला मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस पाठवा
Favorites मध्ये आपण आपल्या आवडीचे एसएमएस साठवून ठेवू शकाल. आपल्या मोबाईलवरील एसएमएस आपणास संगणाकावर दोन प्रकारे पाहता येतील. एक प्रकार आहे Classic View आणि दुसरा  म्हणजे Power View. मला पॉवर व्हू (Power View) अधिक सोयीचा वाटतो. सेटिंग्ज मध्ये जाऊन आपणास नोटिफिकेशन्स मिळण्यासंदर्भात संदर्भात काही बदल करता येतील. माईटीटेक्स्टच्या माध्यमातून आपणास एखादा कॉल कधी येऊन गेला? याची देखील माहिती मिळते.
आता जर कोणाला एसएमएस वर चॅट करायचा असेल, तर अशाप्रकारे आपला मोबाईल संगणकाशी जोडून टाईप करता येईल. त्यामुळे एसएमएस चॅट हा एखाद्या इंटरनेट मेसेंजर चॅट सारखा होईल. आपल्या चॅटची गती आणि अचूकता दोन्हीही वाढीस लागेल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.