आपले याहू खाते अधिक सुरक्षित करा

गूगलचे खाते जास्त सूरक्षित करण्यासंदर्भातील माहिती आपण घेतली आहे. २ स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर करुन याहूचे खाते अधिक सुरक्षित कसे करायचे? ते आज आपण पाहणार आहोत. आपल्यापैकी अनेकजण याहू मेलचा वापर करत असतील. याहूच्या खात्याची सुरक्षा वाढवल्यानंतर कोणालाही आपले मेल पाहण्यासाठी केवळ पासवर्ड ओळखून चालणार नाही, तर त्याचबरोबर एका सिक्युरिटी कोडची आवश्यकता भासेल, जो केवळ आपल्याच मोबाईल क्रमांकावर येईल. याहूसाठी अशी दुहेरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याबाबत आता आपण माहिती घेऊ.

आपले याहू खाते अधिक सुरक्षित करण्यासंदर्भातील पायर्‍या

 1. ymail.com वर जा आणि याहूचे युजरनेम (ईमेल आयडी), पासवर्ड देऊन लॉग-इन व्हा.
 2. स्क्रिनच्या उजव्या बाजूस वर आपणास गिअरचे एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करुन Account Info उघडा.
 3. सुरक्षेच्या कारण्यास्तव याहू आपणास पुन्हा एकदा पासवर्डची मागणी करेल. आपला पासवर्ड द्या आणि पुढे चला.
 4. तुम्ही आपल्या याहू अकाऊंट संदर्भातील माहिती असलेल्या पानावर असाल. २ स्टेप व्हेरिफिकेशन साठीचा दुवा (लिंक) हा Sign-In and Security विभागात आहे.
 5. Set up your second sign-in verification वर क्लिक करा. २ स्टेप व्हेरिफिकेशनला याहू मध्ये सेकंड साईन इन व्हेरिफिकेशन (Second Sign-In Verification) म्हणून ओळखले जाते.
 6. सेकंड साईन इन व्हेरिफिकेशन सुरु करा. सुरक्षेची दुसरी भिंत भेदण्यासाठी याहूने आपल्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. तुम्ही एकतर आपल्या मोबाईलवर सिक्युरिटी कोड मिळवून आत प्रवेश करु शकता अथवा तुम्हाला एका सिक्युरिटी क्वेश्चनचे उत्तर द्यावा लागेल. सिक्युरिटी कोड हा सिक्युरिटी क्वेश्चनपेक्षा अधिक सुरक्षित असा पर्याय आहे. त्यामुळे गूगल आपणास सिक्युरिटी क्वेश्चनचा पर्याय देत नाही.
 7. याहू
  याहू खाते अधिक सुरक्षित करा
 8. सुरक्षेसाठी याहूशी आपले एकाहून अधिक मोबाईल क्रमांक संलग्न करावे असे मला वाटते. सिक्युरिटी क्वेश्नच असे असावेत, की ज्यांची उत्तरे आपणास तर अगदी सहज मुखोद्गत असतील, पण इतर कोणा अनोळखी व्यक्तिस ती देता येणार नाहीत. आपले मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करा आणि सिक्युरिटी क्वेश्चन अपडेट करा.
 9. आपले याहू खाते हे आता २ स्टेप व्हेरिफिकेशनच्या माध्यामतून अधिक सुरक्षित झाले आहे.
 10. अँड्रॉईड, आयफोन, विंडोज फोन किंवा विंडोज ओएस वर आपण याहूचे एखादे अ‍ॅप्लिकेशन वापरत असाल, तर अशावेळी आपणास अ‍ॅप स्पेसिफिक पासवर्डची गरज भासेल. हा पासवर्ड एकदाच जनरेट करावा लागेल, कारण अ‍ॅप्लिकेशनमध्ये प्रवेश करत असताना आपण पासवर्ड सेव्ह करुन ठेवण्यासंदर्भातील पर्याय निवडू शकता.
तुम्हाला जर तुमचे याहू खाते (याहू मेल) आणि त्यातील माहिती महत्त्वाची वाटत असेल, तर ते लगेच सेकंड साईन इन व्हेरिफिकेशनने अधिक सुरक्षित करायला हरकत नाही.