आपल्या ब्लॉगला, लेखामध्ये व्हिडिओ कसा जोडायचा?

कालच एका वाचकाने मला हा प्रश्न विचारलेला… या प्रश्नाचं अधिक चांगल्याप्रकारे उत्तर देण्यासाठी ब्लॉग लिहिणं गरजेचं होतं. म्हणूनच आज मी या विषयावर ब्लॉग लिहित आहे. आपण आपल्या ब्लॉगवर एखादा लेख लिहित असताना, त्या अनुशंगाने काही व्हिडिओ त्या लेखाच्या शेजारी टाकण्याची गरज भासते. किंवा असा एक व्हिडिओ असतो, जो आपल्याला आपल्या ब्लॉगच्या साईडबारमध्ये टाकायचो असतो, अथवा ब्लॉगच्या बॉटमला किंवा वर टाकायचा असतो. तर या सार्‍या गोष्टी आपल्याला कशा करता येतील!? ते आज आपण पाहणार आहोत. हे करणं अगदीच सोपं आहे. त्यासाठी आपल्याला तज्ञ असण्याची काही एक गरज नाही. फक्त काही HTML कोड्स बरोबर आपण खेळणार आहोत.

* प्रथम आपण पाहूयात लेखा दरम्यान एखादा व्हिडिओ कसा टाकायचा!?

लेखा दरम्यान व्हिडिओ जोडण्याबाबत :
१. आपल्याला आपल्या मोबाईलवर असलेला अथवा कोणत्याही व्हिडिओ कॅमॅरॅवर असलेला व्हिडिओ जर ब्लॉगला जोडायचा असेल, तर त्यासाठी आधी तो व्हिडिओ आपल्या संगणकावर घ्या. आणि मग तो गुगलच्या ‘यु ट्युब’ या वेबसाईटवर अपलोड करा. त्यासाठी ‘यु ट्युब’ या वेबसाईटवर आपले खाते असणे आवश्यक आहे.
२. आता आपल्याला हवा तो व्हिडिओ ‘यु ट्युब’ वर आहे, असे गृहित धरु.  आता फक्त प्रश्न उरला आहे तो, तो व्हिडिओ लेखादरम्यान घेण्याचा किंवा आपल्या लेखाला जोडण्याचा. आणि इथून पुढं सारं काही खूपच सोपं आहे.
३. आता समजा मला स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती या कार्यक्रमाचे टायटल साँग माझ्या लेखादरम्यान जोडायचे आहे, तर मग काय करता येईल? मी त्या व्हिडिओ खालील ‘Embed’ या पर्यायावर क्लिक करेन. त्यानंतर तिथे मला एक HTML कोड मिळेल, तो मी माऊसच्या सहाय्याने कॉपी करेन. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे मी माझा व्हिडिओ प्लेअर एडिट देखील करु शकतो, म्हणजेच त्याला हवा तसा आकार आणि रंग देऊ शकतो. मला हवा तसा बदल केल्यानंतर मिळालेला कोड मी माझ्या माऊसच्या सहाय्याने कॉपी केला आहे.

यु ट्युब वर मिळणारा HTML कोड आणि इतर पर्याय
रायटिंग पॅडचे मोड

४. आता मी माझा लेख जिथे टाईप करत आहे, त्या तिथे आलो आहे. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन मोड आहेत. Edit HTML आणि Compose. त्यापैकी Compose मोडमध्ये मी सध्या आहे. आता या कंपोज मोडमध्येच मी माझा कॉपी केलेला HTML कोड पेस्ट करुन ‘SAVE’ करत आहे. किंवा हा कोड मी HTML Editor मध्ये देखील पेस्ट करु शकतो.
५. हा कोड पेस्ट करत असताना फक्त इतकीच काळजी घ्यावी की, आपण देत असलेला व्हिडिओ, लेखादरम्यान ‘ज्या शब्दांसंदर्भात’ देत आहोत, त्या शब्दांशेजारीज, शक्यतो आसपास तो कोड पेस्ट करावा. म्हणजे तो विषयाला धरुन वाटेल.

लेखा सोबत व्हिडिओ जोडण्याचा दुसरा सोपा उपाय :

ब्लॉगर ब्लॉगच्या रायटिंग पॅडचा मेनू बार
Insert a video चे चिन्ह

लेखा दरम्यान व्हिडिओ जोडण्याचा दुसरा एक सोपा उपाय म्हणजे आपला व्हिडिओ थेट ब्लॉगरवर अपलोड करणं! यासाठी यु-ट्युब खात्याची गरज नाही. चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘Insert a Video’ चे चिन्ह आपल्याला आपल्या रायटिंग पॅडच्या मेनूबारमध्ये दिसत असेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अगदी सहज एखादा व्हिडिओ आपल्या संगणकावरुन ब्लॉगवर घेऊ शकता.

* तर हे झालं लेखादरम्यान व्हिडिओ जोडण्याबाबत. आता आपण एखादा व्हिडिओ आपल्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये जोडण्याबाबत पाहूयात.

ब्लॉगच्या साईडबार मध्ये व्हिडिओ कसा जोडायचा?
१. वर सांगितल्याप्रमाणे मी यु ट्युब वरुन मला हवा असलेला एक व्हिडिओ निवडला आणि त्याचा HTML कोड माऊसच्या सहाय्याने कॉपी केला.
२. त्यानंतर मी ब्लॉगरच्या Design (Layouts) या पर्यायावर गेलो. Design या पर्यायामधील Page Elements या पहिल्याच पर्यायावर सध्या मी आहे.
३. त्यानंतर साईडबारमधील Add a Gadget या पर्यायावर मी क्लिक केलं. HTML/JavaScript हे गॅजेट त्या तिथून निवडलं.
४. तिथे Content च्या रिकाम्या चौकटीत मी यु ट्युब वरुन कॉपी केलेला कोड पेस्ट केला. आणि मग SAVE बटण दाबून तो कोड सेव्ह केला. अशाप्रकारे माझ्या साईडबारमध्ये यु ट्युब व्हिडिओ जोडला गेला आहे.

* यु ट्युब च्या व्हिडिओ प्लेअरचा आकार आवश्यकतेनुसार बदलण्यासाठी आपल्याला आपण कॉपी केलेल्या HTML कोड मध्ये थोडाफार बदल करावा लागेल. त्या कोडमध्ये width आणि height च्या समोर जे आकडे दिले आहेत, त्यात आपल्या बदल करावा लागेल. असा बदल करुन आपण आपल्याला हव्या त्या आकाराचा व्हिडिओ ब्लॉगवर ठेवू शकतो.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.