आर्टपॅड सोबत पेंन्टिंग काढा

कालच मी ही वेबसाईट पाहिली, जिथे तुम्ही ऑनलाईन पेंन्टिंग काढू शकता. सारं काही सोपं आहे आणि त्यामुळेच मला अधिक काही सांगत बसण्याची गरज  नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या तिथे जा आणि एकदा हे टुल वापरुन पहा. मला आशा आहे तुम्हाला ते आवडेल. या इथे क्लिक करा.

रिप्लेवर क्लिक केल्यावर तुम्ही ती पेंन्टिंग कशीकशी काढली!? त्याचे स्क्रिनवर पुनःश्च सादरीकरण होईल. तुमच्या पेंन्टिंगसाठी तुम्ही फ्रेम सिलेक्ट करु शकता. अन-डू ची सोय तर आहेच. याशिवाय तुन्ही तुमची पेंन्टिंग सेव्ह करुन सेंडही करु शकाल. बाकी इतर काही छोटेमोठे टुल्सही आहेतच. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील रसकांसमोर मोफत ऑनलाईन आपली कलाकृती सादर करणं, हे फारच मनोरंजक ठरत आहे. बाकी काय!? आत्तापुरतं बायऽऽऽ 🙂 यमक जुळलं!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.