इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे

री बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील? हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील खूप आकर्षक आहे. पण एखादी गोष्ट जमणार्‍याला जमते, तर न जमणार्‍याला अथक परिश्रम करुनही जमत नाही. याचा अर्थ असा नाही की, न जमणारा कमी आहे. त्याने यावरुन इतकंच लक्षात घ्यायला हवं की, या जगात आपण कोणत्यातरी दुसर्‍या कामासाठी बनलो आहोत, जे इतर फारच कमी लोक करु शकतात.

जून २०१२ च्या या संपूर्ण महिन्यामध्ये आपण ऑनलाईन पैसे कमवण्याचे विवध मार्ग पाहणार आहोत. मी आपल्याला केवळ निरनिराळ्या दिशा दाखवण्याचे काम करेन, आपण हमखास श्रीमंत व्हाल अशी खात्री मात्र मी देऊ शकत नाही. आपण हे काम किती हुशाराने, झोकून देऊन, आणि संयम ठेवून कराल यावर आपलं यश आवलंबून आहे. ऑनलाईन पैसे कमवणं हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप सारे कष्ट लागतात आणि त्याहून अधिक संयम लागतो. सुरुवातीच्या अनेक महिन्यांमध्ये आपली ० (नाममात्र) रुपयांवर अनेक तास काम करण्याची तयारी हवी. त्यामुळे आपली आवड या कामामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे.
इंटरनेटवरुन ऑनालाईन पैसे कमवणं
पैसे कमवणे हे खरं तर दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपल्या विचारात जर सहजपणा असेल, तर खूप सारे पैसे कमवणं हे तसं फार काही अवघड काम नाही. पण अनेकदा निराशा आपल्यावर अधिक प्रभावी ठरते आणि अशावेळी संपूर्ण गरजेपेक्षा थोडेसे अधिक पैसे कमवणं हे फारच कठीण काम होऊन बसतं. यात नेकमी आपली गरज किती? हे ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ते देखील शेवटी प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
पैसे कमवण्याचे जे विविध मार्ग मी सांगणार आहे, ते सर्व मार्ग मी स्वतः आजमावून पाहिले आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की मी स्वतः त्यात यशस्वी झालो आहे. पण तरी देखील ऑनलाईन पैसे कमवण्याच्या सर्व दिशा मी आपल्याला दाखवून देणार आहे. कारण मला एखादी गोष्ट जमली नाही, याचा अर्थ असा नाहीये की ती गोष्ट आपल्याला देखील जमणार नाही.

मी माझं करिअर या क्षेत्रात निर्माण केलं आहे आणि आपणही नक्कीच इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवू शकाल. आपण जर नोकरी करत असाल आणि अतिरिक्त कमाई अशा दृष्टिने सहजतेने आपण हे काम करत गेलात, तर आपण नक्कीच निराश होणार नाही.

‘ऑनलाईन पैसे कमवणे’ ही लेखमाला मी या पानावर एकत्र संकलीत करेन, जेणेकरुन नंतर आपणास ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळवणं सोपं जाईल. मी उद्यापासून ऑनलाईन पैसे कमवण्यासंदर्भात लेख लिहिण्यास सुरुवात करेन. त्या सर्व लेखांचे दुवे मी नंतर या इथे खाली देईन.

१. लिंक शेअर करुन पैसे कमवणे

२. इंटरनेटवर लिहून पैसे कमवणे

३. पैसे कमवण्यासाठी लेख कुठे लिहावे?

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.