इंटरनेटवरुन मोबाईलवर अधिक कॅरॅक्टर्सचा मोफत sms पाठवा

ला विश्वास बसत नाहीऽ… इतकं सोपं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं! संगणकावरुन इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईलवर मोफत एस.एम.एस. सेंड करण्यासाठी इतके दिवस मी 160by2 आणि way2sms या वेबसाईट्स वापरत होतो, याशिवाय काही ‘सोशल नेटवर्कस्‌’ चा उपयोगही मी याकामात करत होतो. पण त्यापॆकी कोणतीही सुविधा वापरुन मला १४० कॅरॅक्टर्सहून अधिक लांबीचा sms सेंड करता येत नव्हता.

मोफत sms पाठवा

मनाला स्पर्श करणार्‍या सुंदर सुंदर एस.एम.एस. चा संग्रह असणारी sms4smile ही माझी आवडती वेबसाईट आहे. या वेबसाईटवरचे मला आवडणारे sms मित्रांना सेंड करण्यासाठी, मला माझ्या मोबाईलवर हवे असतात. पण आता ते एस.एम.एस. मोबाईलवर टाईप करत बसणंऽ म्हणजे एक अशक्यप्रायच काम आहे. म्हणूनच मग सहाजीकच मी 160by2 आणि way2sms या वेबसाईट्सचा उपयोग या कामात करतो! …पण मग अनेकदा १४० कॅरॅक्टर्स मध्ये अर्धेअर्धवट sms च मोबाईलपर्यंत पोहचतात. आणि मग पार वॆताग येऊन जातो, मुड ऑफ होतो… पण आज मात्र मी खूपच खुष आहे, कारण फायनली मला अशी एक मोफत वेबसाईट सापडली आहे, जिचा उपयोग करुन मी माझ्या मोबाईलवर फक्त १४० नव्हे तर चक्क ४४० कॅरॅक्टर्सचा sms पाठवू शकतो. त्यामुळे माझी तर समस्या आता सुटली आहेऽऽ, आणि मग मला वाटलं की, अशीच समस्या आमच्या वाचकांपॆकी कोणाला भेडसावत असेल तर!? म्हणून लगेच हे आर्टिकल लिहायला घेतलं.

जिथून आपण ४४० कॅरॅक्टर्सचा एस.एम.एस. पाठवू शकतो, त्या वेबसाईटचा पत्ता तर सांगायचाच राहून गेला… तर ही जबरदस्त उपयुक्त सुविधा आपल्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे sms7.in या वेबसाईटने! आत्ताच sms4smile या वेबसाईटवरुन अनेक सुंदर सुंदर एस.एम.एस. sms7.in या वेबसाईटच्या सहाय्याने मी माझ्या मोबाईलवर घेतले! आणि ते मी आता माझ्या मित्रांना सेंड करणार आहे. तुम्ही तोपर्यंत sms7.in या वेबसाईटला एक चान्स देऊन पहा!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.