इंटरनेटवर इंडिया अगेन्स्ट करप्शन

ण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया अगेन्स्ट करप्शनचे’ सध्या भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन सुरु आहे. या देशव्यापी आंदोलनाचे प्रतिबिंब आपण इंटरनेटच्या ऑनलाईन विश्वात तितक्याच जोश आणि उत्साहाने उमटलेले पाहू शकतो. इंडिया अगेन्स्ट करप्शनची स्वतःची अशी ऑफिशिअल वेबसाईट आहे. जिथे आपण लोकपाल नक्की काय आहे? हे देखील समजून घेऊ शकतो. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या फेसबुक पेजलाही अतिशय जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, आपण प्रत्येक सेकंदाला जरी हे फेसबुक पेज रिफ्रेश केलेत, तरी आपल्याला त्यात काही नवीन सदस्यांची भर पडलेली दिसून येईल. बघता-बघता केवळ या चार-पाच दिवसांत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या या फेसबुक पेजला १ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. आत्तापर्यंत ३.६ लाखांहून अधिक लोकांनी या पेजला लाईक केले असून, आज रात्री उशीरापर्यंत हे पेज ४ लाख लाईक्सचा टप्पा पार करेल. याव्यतिरीक्त तिहार कारागृहातून किरण बेदी यांनी अण्णांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ देखील आपण किरण बेदी यांच्या यु ट्युब चॅनलवर पाहू शकतो. इंटरनेटवर इंडिया अगेन्स्ट करप्शनचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शन

इंडिया अगेन्स्ट करप्शनचा एक फोन नंबर आहे. त्यावर आपण कॉल केल्यास रिंग वाजून कॉल आपोआप डिसकनेक्ट होईल, म्हणजेच मिस कॉल होईल. मिस कॉल असल्याने आपल्याला कोणताही चार्ज पडणार नाही. अशाप्रकारे आपण इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवू शकाल. आपला पाठिंबा नोंदवून घेतला असल्याची पोच आपल्याला SMS द्वारे मिळेल. १५ ऑगस्ट पर्यंत १.३ करोड मिस कॉल या नंबरवर नोंदविले गेले आहेत. हा नंबर आहे – ०२२६१५५०७८९.  

इंडिया अगेन्स्ट करप्शनची मुख्य अधिकृत वेबसाईट आहे – indiaagainstcorruption.org
याव्यतिरीक्त प्रत्येक मोठ्या शहरासाठी त्यांच्या काही उपसाईट्स आहेत. आपल्या शहरातील इंडिया अगेन्स्ट करप्शनची कार्यक्रमपत्रिका आपण या साईट्सच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. आपल्याला जर या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा असेल, तर या साईट्सच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. खाली मी महाराष्ट्रातील शहरांची नावे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या संबंधीत साईट्सची नावे देत आहे.
पुणे – iacpune.org
पुणे (ब्लॉग-साईट) – iacpune.blogspot.com
मुंबई – iacmumbai.org
नागपूर – iacnagpur.org
महाराष्ट्राबाहेरील वाचकांसाठी : चेन्नई, बेंगलोर या शहरांसाठी देखील इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या साईट्स आहेत. शिवाय भारताबाहेरल लोकांसाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनची साईट आहे – nriac.org
इंडिया अगेन्स्ट करप्शनचा प्रचार कराण्यासाठीचे साहित्य आपल्याला या साईटवर मिळेल – iacbranding.org
आपल्या शहरातील उपोशनविषयक कार्यक्रमांची माहिती आपल्याला या इथे मिळेल – peoplespeak.in
याव्यतिरीक्त इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या इतर शहर, प्रदेश, कार्यक्रम विषयक वेबसाईट्स आपल्याला त्यांच्या मुख्य साईटवरील मिळतील. त्यासाठी Other IAS Sites हा विभाग पहावा.
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या साईटवर त्यांच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधन्यासाठी फोन नंबर, ई-मेल पत्ते देण्यात आले आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेला आर्थिक हात देण्याची सोय देखील इथे करुन देण्यात आली आहे. सरकारी लोकपाल काय आहे? जनलोकपाल काय आहे? या दोघांमध्ये काय फरक आहे? यासंबंधीचे दस्ताऐवज देखील या साईटवर लोकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एकंदरीत ही मोहिम राबवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी, माहिती या साईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे फेसबुक पेज – facebook.com/IndiACor
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे ट्विटर खाते – twitter.com/janlokpal
इंडिया अगेन्स्ट करप्शनची ऑर्कुट कम्युनिटीorkut.co.in/Main#Community?cmm=112969105
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.