इंटरनेट वरील कोणतेही पान ऑर्कुट वर शेअर करा

मागे एकदा क्रोम वेब ब्राऊजर वापरत असताना, इंटरनेटवरचे आवडलेले पान ऑर्कुटवर शेअर करण्यासाठीचे बटण मी वापरले होते. अगदी उपयुक्त असं हे बटण आहे! म्हणजे कसं? तर याचा युज केल्याने इंटरनेटवरील आवडलेल्या पानाबद्दलची माहिती, आपण आपल्या ऑर्कुट प्रोफाईल अपडेट्सद्वारे सर्व मित्रांपर्यंत लगेच पोहचवू शकतो.

ऑर्कुटमध्ये ‘प्रमोट’ नावाची नवीन गोष्ट मागील काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. ‘वाघ वाचवा!’ अशा मथळ्याखाली काही जणांनी केलेलं प्रमोशन आज मला ऑर्कुटवर दिसून आलं आणि मला त्या क्रोमवरील बटणाची पुन्हा एकदा आठवण झाली! कारण त्या बटणाचा उपयोग केल्याने एकतर ‘प्रमोट’ जाहिरात आपोआप तयार होत होती आणि आपल्या ऑर्कुट अपडेट्सद्वारेही आपण देत असलेली माहिती मित्रांपर्यंत पोहचू शकत होती.

म्हणून मग शेवटी गुगल सर्च इंजन मधून त्या बटणाचा शोध घेतला! आधी मला वाटत होतं की, ते बटण सहजासहजी मिळणार नाही …पण खरं तर मला ते लगेच सापडलं. मी सध्या फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरत असल्याने मला माझ्या फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी ते बटण हवं होतं.

या इथे तुम्हाला तुमच्या ‘कोणत्याही’ वेब ब्राऊजर साठी ‘share on orkut’ हे बटण मिळेल. फायरफॉक्स वाल्यांनी आपल्या माऊसचे लेफ्ट क्लिक दाबून धरत त्या तिथे दिलेले बटण उचलायचे आणि वेब ब्राऊजरच्या वरच्या बुकमार्क बार मध्ये सोडून द्यायचे! की झालं!

खाली मी काही स्क्रिनशॉट्स देत आहे… फायरफॉक्स, क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी असे वेगवेगळे वेब ब्राऊजर्स वापरणार्‍यांनी ते बटण आपल्या वेब ब्राऊजरवर कसे घ्यावे!? हे त्यातून सांगितले आहे. वर दिलेल्या लिंकद्वारेही तुम्ही ही माहिती मिळवू शकता! खाली देत असलेले स्क्रिनशॉट्स मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करा, ते नवीन टॅबमध्ये ओपन होतील. खाली चित्रात दाखवलेले बटण मिळविण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर जावे लागेल.

इंटरनेट एक्सप्लोरर
मोझिला फायरफॉक्स
सफारी
गुगल क्रोम

आता एकदा हे बटण आपण आपल्या वेब ब्राऊजर वर घेतलं आहेच, …तर मग 2know.in चं हेच पान share on orkut करुन …म्हणजेच ऑर्कुटवर शेअर करुन तुमच्या बटणाची चांगली सुरुवात करा! share on orkut हे बटण कसं काम करतं!? ते पहा!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.