इंटरनेट वापरुन संगणकावरुन मोबाईल फोनवर मोफत कॉल

ज मी एका अशा मजेशीर वेबसाईटची माहिती सांगणार आहे, जिचा उपयोग करुन तुम्ही इंटरनेट वरुन कोणत्याही मोबाईलवर अगदी मोफत कॉल करु शकता. आणि इतकंच नाही तर हा मोफत कॉल करण्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायची देखील गरज नाही. बस्स! त्या साईटवर जायचं, नंबर डायल करायचा आणि लागला कॉल! मी आत्ताच ती वेबसाईट स्वतः ट्राय केली. मी माझ्याच मोबाईलचा नंबर डायल केला आणि मला कॉल आला. जेंव्हा मी माझ्या मोबाईलवर ‘हॅलोऽ’ म्हटलं, तेंव्हा संगणकाच्या स्पिकर मधून मला माझाच आवाज ऎकू आला. थोडक्यात काय!? तर ही वेबसाईट काम करते!

पण तरीही मला वाटतं हे कॉल अनलिमिटेड नसणार आहेत. काहीतरी वेळेचं बंधन नक्कीच आपल्याला पाळावं लागेल. पण असू द्या ना! आहे तेही नसे थोडके! नाहीतरी मोबाईलवर फ्रि कॉल करत आहोत आपण. कधीतरी आपल्या मोबाईलमधला बॅलंस संपला असेल आणि अत्यंत गरजेच्या वेळी, समोरच्याला ‘कॉल कर!’ इतकंच म्हणता आलं, तरी ठीक आहे ना!

मोबाईल फोनवर फ्रि कॉल

संगणकावरुन इंटरनेटचा वापर करुन मोबाईलवर मोफत कॉल करण्यासाठी या इथे क्लिक करा. कोणत्या देशातील मोबाईलवर आपण कॉल करणार आहात!? तो देश निवडा, माऊसच्या कर्सरच्या सहाय्याने नंबर डायल करा आणि कॉल करा! झालंऽ! काही क्षणातच तुमचा कॉल सुरु होईल. या सुविधेचा वापर करुन तुम्ही मोबाईलव्यतिरीक्त लँडलाईन फोनवर मोफत कॉल करु शकता.

इंटरनेटवरुन मोबाईलवर विदाऊट रजिस्ट्रेशन मोफत कॉल करण्यासाठी ‘इवाफोन’ ही एक उपयुक्त वेबसाईट आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.