इमेजचा आकार, मेमरी कमी करा

मस्कार मित्रांनो! तुम्ही कसे आहात!? एक नवीन महिना सुरु झाला आहे. माझ्या दृष्टीने हा महिना थोडासा बोऽअर आहे. पण या महिन्याचे १८ लेख पूर्ण करण्याचा माझा पुरेपुर प्रयत्न राहिल. कदाचीत या महिन्याच्या अखेरपर्यंत आपण 2know.in च्या लेखांचे शतक पूर्ण करु!

एखाद्या इमेजचा आकार कमी कसा करता येईल!? ते आज आपण पाहणार आहोत. पर्वा माझ्या दुसर्‍या एका ब्लॉगवर लिहित असताना मला एक समस्या जाणवली, ती म्हणजे माझ्या ब्लॉगशेजारी मी जे फोटो अपलोड केले होते, त्यांची मेमरी खूप जास्त होती आणि मग पेज लोड व्हायला देखील खूप वेळ लागत होता. म्हणून त्या फोटोची, इमेजची मेमरी कमी करुन मी तो पुन्हा माझ्या ब्लॉगवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला.
खरं तर या कामात एखाद्या ऑनलाइन सेवेची मदत घ्यावी असा विचार मी करत होतो, पण नंतर वाटलं तो फोटो ऑनलाईन अपलोड करा, मग रिसाईझ करा आणि मग परत डाऊनलोड करुन ब्लॉगवर अपलोड करा… इतकं करत बसण्यापेक्षा संगणकावरुनच आपली इमेज रिसाईझ करावी. त्यासाठी मी काय केलं!?

१. माझी इमेज संगणकावरील ज्या फोल्डरवर होती, तो फोल्डर ओपन केला.
२. जी इमेज रिसाईझ करायची आहे, त्यावर राईट क्लिक केलं.
३. Open With – Microsoft Photo Editor.
४. तुमच्याकडे जर Microsoft Photo Editor नसेल, तर ते तुम्हाला या इथे मोफत मिळेल.
५. Microsoft Photo Editor मधून माझी इमेज ओपन केल्यानंतर Image या पर्यायावर मी माझ्या माऊसचा कर्सर नेला आणि Resize… वर क्लिक केले.
६. % चे दोन बॉक्स आहेत. त्या दोन्ही ठिकाणी मी ५०% केलं (तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कितीही कमी करु शकता). आणि मग OK वर क्लिक केलं.
७. अशाप्रकारे माझ्या इमेजचा आकार आता निम्याने कमी झाला आहे.
८. आणि जसा आकार कमी झाली आहे, तशीच त्याची मेमरी देखील कमी झाली आहे.

मायक्रोसॉफ्ट फोटो एडिटर

तर Microsoft Photo Editor चा उपयोग करुन तुम्ही कोणत्याही इमेजचा आकार क्षणात बदलू शकता! त्या इमेजची मेमरी कमी करु शकता.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.