इमेज चा फॉरमॅट बदला

र्वाच जेंव्हा मी ‘रिलायन्स ब्रॉडबँड प्लस’ वर लेख लिहित होतो, तेंव्हा मला एक समस्या जाणवली, ती म्हणजे… मी स्कॅन केलेल्या पानाची इमेज ज्या फॉरमॅटमध्ये होती, तो फॉरमॅट या इथे इमेज अपलोड करण्यासाठी चालत नव्हता. मग मी माझ्या इमेजचा फॉरमॅट बदलता येईल, अशा ऑनलाईन सेवेचा शोध घेतला आणि मला ‘ऑनलाईन इमेज कन्व्हर्टर’ ही वेबसाईट सापडली. या इथे माझं काम झालं आणि मला माझा लेख यशस्वीरित्या पब्लिश करता आला. तुम्हालाही जर भविष्यात अशी समस्या जाणवली, तर आपल्या इमेजचा फॉरमॅट चेंज करण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग करुन घेता येईल.

१. फॉरमॅट चेंज करुन हवी असलेली इमेज ‘ऑनलाईन इमेज कन्व्हर्टर’ या वेबसाईटवर अपलोड करा.
२. तुम्ही अपलोड केलेली इमेज कोणत्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट होणं अपेक्षीत आहे ते दिलेल्या यादीतून निवडा.
३. रुपांतरीत होणार्‍या इमेजची साईझ तुम्ही ठरवू शकता, त्या इमेजला क्रॉप करु शकता, याशिवाय त्या इमेजचा ब्राईटनेस आणि कॉंट्रास्ट किती असावा हे देखील सुचवू शकता.
४. तुमचा ई-मेल ऍड्रेस पुरवा. अपेक्षीत फॉरमॅटमध्ये बदल झालेली इमेज तुम्हाला मेलने प्राप्त होईल.
५. subscribe to our news वर चुकनही क्लिक करु नका 🙂
६. आता Start वर मात्र क्लिक करा.
७. आता आपल्या इंबॉक्स मध्ये Online Image Converter कडून एक नवीन मेल आलेला असेल. तो उघडा.
८. फॉरमॅट चेंज झालेली इमेज डाऊनलोड करुन घ्या.

मला वाटतं आता इमेज चा फॉरमॅट चालत नाही म्हणून निराश व्हायची गरज नाही.

इमेज चा फॉरमॅट बदला
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.