एखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल?

पली स्वतःची जर एखादी वेबसाईट असेल तर आपल्याला अशी उत्सुकता असणं सहाजीक आहे की, ‘माझ्या वेबसाईटचा जगात कितवा क्रमांक असेल?’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. म्हणजे जसं पहा… खरं तर यात अभिमानाने सांगण्यासारखं काही नाही 🙂 पण 2know.in ची जागतीक ऍलेक्सा ट्रॅफिक रॅंक आहे ९३,२६,९३२. ठिक आहे… ठिक आहे… तुम्हाला तर माहितच आहे की आमची ही वेबसाईट सुरु करुन एकच महिना झाला आहे. आणि ही एक मराठी वेबसाईट आहे त्याला मी काय करु? 🙂 (हा लेख लिहिल्यानंतर १५ दिवसांनी, आज आमच्या वेबसाईटने ५७,८८,१७३ या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे.) (आज ११/०४/१० रोजी 2know.in चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे!) आता आपले मराठी ब्लॉगविश्वसुद्धा ५,१३,९३७ क्रमांकावर आहे. यावरुन तुम्हाला मराठी वेबसाईट्सच्या स्थितीची थोडिफार कल्पना येऊ शकेल. मनोगत आहे ३,९७,०९८ वर. मिसळपाव आहे १,८४,५१० वर. ई-सकाळ आहे ५९,४३४ वर. जिथे ई-सकाळची ही अवस्था तिथे आणखी काय बोलावं? कदाचीत ही स्थिती येत्या १० वर्षात पालटेल, पण सध्या जे आहे ते असं आहे.

याशिवाय देखील ऍलेक्सा टॅफिक रॅंकचा भरपूर उपयोग होतो. जसं की समजा दोन एकसारख्या वेबसाईट्स आहेत ज्या समान सर्व्हिस प्रोव्हाईड करतात पण त्यापॆकी विश्वसनीय आणि वापरायला सोपी कोणती हे कसं ठरवणार? अशावेळी जनतेचा कॊल घेणं महत्त्वाचं ठरू शकेल. उदाहरणार्थ मी ‘online mobile recharge’ असं गुगल मध्ये सर्च केलं. त्यावेळी मला rechargeitnow आणि fastrecharge अशा दोन वेबसाईट्स दिसून आल्या. पॆशांचा प्रश्न असल्याने विश्वसनीयताही महत्त्वाची ठरते. म्हणूनच मी ऍलेक्सा या वेबसाईटवर वरील दोन्ही वेबसाईट्सचा भेट देणा-यां बाबतीतला (व्हिजिटर्स) भारतीय क्रमांक पाहिला. कारण या वेबसाईट्स भारतीय मोबाईल रिचार्ज करतात. तेंव्हा fastrecharge चा क्रमांक होता ४,५०९, तर rechargeitnow चा क्रमांक होता १,२४७. यावरुन हे सिद्ध होतं की, आपला मोबाईल ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी rechargeitnow या वेबसाईटचा उपयोग करणं लोक अधिक पसंत करतात. तर ऍलेक्सा.कॉम चा असाही एक उपयोग होऊ शकतो. जाता जाता आपण जगातल्या आणि भारतातल्या टॉप १० वेबसाईट्स पाहूयात.

दिनांक १९ फेब्रुवारी २०१० रोजी जागातील टॉप १० वेबसाईट्स आहेत…
१. google.com
२. facebook.com
३. yahoo.com
४. youtube.com
५. live.com
६. wikipedia.org
७. blogger.com
८. baidu.com
९. msn.com
१०. qq.com

दिनांक १९ फेब्रुवारी २०१० रोजी भाततातील टॉप १० वेबसाईट्स आहेत…
१. google.co.in
२. google.com
३. yahoo.com
४. facebook.com
५. blogger.com
६. youtube.com
७. orkut.co.in
८. rediff.com
९. wikipedia.org
१०. orkut.com

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.