ऑर्कुट वर मित्र विनंती पाठवा, व्यक्ति जोडा

ज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की, ऑर्कुटवर फ्रेंड रिक्वेस्ट (मित्र विनंती) कशी पाठवायची!? स्विकारायची!? हे सारं काही मी नवीन ऑर्कुट संदर्भात सांगत आहे. जे आजूनही जुनं ऑर्कुट वापरत आहेत, ते ऑर्कुटच्या वरील भागातील मेनूबारमधून ‘नवीन ऑर्कुट’ ची निवड करु शकतात.

कधीकधी मला वाटतं, हे मी काय सांगत आहे!? म्हणजे मी इंटरनेट इतकी वर्ष झाली वापरत आहे की, आता या सार्‍या गोष्टी मला ‘सहाजीक’ वाटतात. म्हणजे केवळ माझ्यासाठीच असं नव्हे, तर मला सगळ्यांसाठीच या गोष्टी ‘सहाजीक’ वाटतात. पण माझा मित्र जेंव्हा मला असे साधे साधे प्रश्न विचारतो, तेंव्हा मला वाटतं की, कदाचीत याच्यासारखेच आणखीही काही लोक असतील, त्यांच्यासाठी आपण लेख लिहूयात.

तर तुम्हाला सांगता सांगता आज मीही एक फ्रेंड रिक्वेस्ट (मित्र विनंती) पाठवणार आहे.

१. मी आत्ता ऑर्कुटच्या मुख्य पानावर आहे. म्हणजेच ऑर्कुटवर लॉग इन केल्यानंतर आपण ज्या पानावर येतो, त्या पानावर सध्या मी आहे.
२. आता मी त्या व्यक्तिच्या पानावर जात आहे, ज्या व्यक्तिला मला मित्र म्हणून जोडायचे आहे.

मित्र जोडा

३. त्या व्यक्तिच्या पानावर, त्या व्यक्तिच्या नावासमोर add as friend नावाचे करड्या रंगाचे बटण आहे, त्या बटणावर मी क्लिक करत आहे.
४. त्यानंतर एक रिकामी चौकट माझ्यासमोर आली आहे. त्या चौकटीत लिहिले आहे, “Hey (इथे नाव आहे!), add me as your orkut friend. Rohan Jagtap.” मी त्या रिकाम्या चौकटीतील संदेश तसाच ठेवून send invitation या बटणावर क्लिक करु शकतो अथवा त्या रिकाम्या चौकटीत माझ्या मनाप्रमाणे काही संदेश टाकू शकतो, जेणेकरुन ज्या व्यक्तिला मी फ्रेंड रिक्वेस्ट (मित्र विनंती) पाठवत आहे, त्या व्यक्तिला माझी ओळख पटेल.

ओळख पटविणारा संदेश लिहून मित्र विनंती पाठवा

५. मी माझ्या मनातला एक संदेश त्या रिकाम्या चौकटीत टाकला आहे आणि आता मी send invitation या बटणावर क्लिक करत आहे. आणि अशाप्रकारे “Your friend invitation has been sent.” नावाचा संदेश मला दिसला आहे. याचा अर्थ असा की, माझी फ्रेंड रिक्वेस्ट (मित्र विनंती) संदर्भित व्यक्तिपर्यंत पोहचली आहे.
६. आता ती व्यक्ति जेंव्हा आपल्या ऑर्कुट खात्यात लॉग इन करेल, त्या व्यक्तिला तिच्या मुख्य पानावर माझी फ्रेंड रिक्वेस्ट (मित्र विनंती) दिसेल. आणि मग तिथे दोन पर्याय दिलेले असतील, accept friend request!? 1. yes 2. no. त्या व्यक्तिने यापैकी yes या पर्यायाची निवड केली, तर ती आपल्या ऑर्कुट फ्रेंड्स लिस्ट मध्ये समाविष्ट होईल आणि आपण मग त्या व्यक्तिबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकाल.

तर अशाप्रकारे आज आपण पाहिलं की, ऑर्कुट द्वारे आपल्याला आपला जुना मित्र किंवा एखादी व्यक्ति कशी जोडता येईल!? आशा आहे की, आता आपल्याला याबाबत कोणतीही समस्या जाणवणार नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.