गुगलच्या सेवा मराठीतून वापरा

मी गुगलच्या सर्व सेवा मराठीतून वापरतो. तुम्हीही तसं करु शकता! इंग्लिशची सवय झालेली असल्याने सुरुवातीला थोडं चुकल्याचुकल्या सारखं वाटू शकतं, पण नंतर नंतर मराठी अगदी सवयीची होऊन जाते! आपण जीमेल मराठीतून वापरू शकतो, ऑर्कुट मराठीतून वापरु शकतो. फेसबुकच्या मराठी भाषांतरातही मी मोलाची मदत केली आहे. पण अजून ते काम चालू आहे! मराठीतून गुगलच्या सेवा वापरणं हेदेखील आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचं एक चांगलं माध्यम आहे.

जीमेल मराठीतून वापरण्यासाठी तुम्ही असं करु शकता…
१. gmail.com वर जा.
२. उजव्या बाजूला वर settings वर क्लिक करा.
३. General मध्येच language हा पर्याय दिलेला आहे.
४. तिथे gmail display language ‘मराठी’ करा!
५. आता पानाच्या खाली save changes लिहिलं आहे, त्यावर क्लिक करा.
अशाप्रकारे जीमेलची सेवा तुम्हाला मराठीतून दिसायला लागेल.

मराठीतून ऑर्कुट पहायचे असेल तर…
१. orkut.com वर जा.
२. उजव्या बाजूला वर orkut settings वर क्लिक करा.
३. general मध्येच display language मराठी करा.
४. आता save changes वर क्लिक करा.
ऑर्कुट तुम्हाला मराठीतून दिसायला लागेल.

मराठी गुगल

google.co.in च्या बाबतीत सांगायचं झालं तर, त्यांच्या मुख्य पानावरच Marathi हा पर्याय दिलेला आहे! त्यावर क्लिक करा. त्यांनंतर गुगलचे पान हे मराठीतून दिसू लागेल. मागच्या वर्षी गुगलच्या मुख्य पानावरील ‘I’m Feeling Lucky’ चे मराठी भाषांतर कोणी केलं असेल, त्याने काय केलं असावं!? ‘आलिया भोगासी’! मराठी माणसाच्या नशिबात असले भाषांतर ‘आलिया भोगासी’ असंच म्हणवं लागेल… असो! त्यांना आता त्यांची चुक लक्षात आलेली आहे!

बाकी ब्लॉगर तुम्ही मराठीतून वापरु शकता. त्याबाबतचा पर्याय डॅशबोर्डवरच वरच्या बाजूला दिलेला आहे. वर्डप्रेसही आपण मराठीतून वापरु शकतो. मला वाटतं वर्डप्रेसमध्ये तर मराठीसाठी वेगळा विभागच करण्यात आला आहे.

आणखी म्हटलं तर ‘गुगल डॉक्स’ साठी मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. अनेकदा पत्र लिहून, निषेध नोंदवूनही ‘याहू’ ने मात्र आपली सेवा मराठीतून केल्याचं मला दिसून आलेलं नाही! त्यामुळे याहूवर मी थोडासा नाराजच आहे. बाकी ‘वेब दुनिया’ ची मराठी वेबसाईट मात्र अतिशय उत्कृष्ट आहे!

सध्या मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेबाबत सार्थ अभिमान निर्माण झाला आहे. आणि ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे! आपणही जास्तितजास्त मराठीचा वापर करुन मराठी भाषेला बळकटी देऊ शकतो.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.