चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवा, शेअर करा

धीतरी इंटरनेटवर वावरत असताना प्रोफाईल चित्र लावण्यासाठी किंवा इतरत्र चित्र चिटकवण्यासाठी तुम्हाला चित्राच्या url ची विचारणा केली गेली असेल. शक्यतो आपल्या संगणकावरुन चित्र इंटरनेटवर घेण्याची सुविधा उपलपब्ध असते, पण कधी कधी मात्र चित्राच्या url बाबत विचारणा केली जाते. याशिवाय तुम्ही जर ब्लॉगर असाल, वेबसाईटचे मालक असाल किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कचे सदस्य असाल, तर अशावेळी तुम्हाला html कोडच्या स्वरुपातील चित्राचा देखील उपयोग होऊ शकतो. इथे ब्लॉगरवरसुद्धा पोस्ट मध्ये चित्र घेण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे संगणकावरुन आणि दुसरं म्हणजे चित्राची लिंक देऊन आपण ब्लॉगर पोस्ट मध्ये चित्र घेऊ शकतो. आता चित्राची लिंक कशी मिळवायची!? यासाठी एक एकदम सोपी पद्धत आहे. imageshack या वेबसाईटच्या माध्यमातून आपण चित्राची लिंकही मिळवू शकतो शिवाय त्या चित्राचा html कोडही आपल्याला त्यासोबत मिळतो.

चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवण्याची पद्धत :

चित्राची डायरेक्ट लिंक, html कोड मिळवा.
imageshack वेबसाईट

१. imageshack या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल.
२. चित्र अपलोड करण्यासाठी या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पण भविष्यात आपल्याला अपलोड केलेली इमेज डिलीट करायची असेल किंवा आपल्या चित्रांचा व्यवस्थित संग्रह करायचा असेल, तर रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही.
३. आता थेट Browse या बटणावर क्लिक करा आणि आपल्या संगणकावरुन एका चित्राची निवड करा.
४. आपला ई मेल ऍड्रेस द्या अथवा देऊ नका, तो पर्याय ऑप्शनल आहे. Image Resize या पर्यायाद्वारे आपण अपलोड करत असलेल्या चित्राचा आकार ठरवू शकता.
५. आणि आता शेवटी Upload Now या निळ्या बटणावर क्लिक करा. काही क्षणात तुमच्या संगणकावरील चित्र, इंटरनेटवर ऑनलाईन दिसेल.
६. आपण अपलोड केलेले चित्र शेअर कसे कराल? चित्राच्या खाली पहा! त्या तिथे आपण अपलोड केलेले चित्र ‘सोशल नेटवर्क’ वर शेअर करण्याबाबतचे पर्याय दिलेले आहेत.
७. त्यानंतर Direct Link च्या पुढील चौकोनात आपल्याला त्या चित्राची डायरेक्ट लिंक मिळेल.
८. HTML कोडच्या पुढील चौकोनात आपल्याला त्या चित्राचा HTML कोड मिळेल.

अशाप्रकारे एखाद्या चित्राची लिंक, अथवा HTML कोड मिळवणं हे केवळ दोन मिनिटाचं काम आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची देखील काही गरज नाही. इंटरनेटवरील प्रवासात imageshack या वेबसाईटचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होईल, याची मला खात्री आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.