चेहर्‍याचे हावभाव आभ्यासा

र आज आपण चेहर्‍यांच्या हावभावांचा एक खेळ खेळणार आहोत. आपल्या चेहर्‍यावर काय काय असतं ज्यातून आपल्या भावना व्यक्त होतात!? डोळे, भुवया, तोंड, ओठ आणि याशिवाय एकंदरीतपणे खाली वर केलेला चेहरा. माणसाचा मेंदू खरं तर भावना व्यक्त करणार्‍या चेहर्‍यावरच्या अशा बारीक खाणा खुणा लगेच ओळखू शकतो. आणि रोज टि.व्ही. वर कार्यक्रम बघत असताना आपण माणसाच्या हावभावांचा जणू आभ्यासच करत असतो. खरं तर डायरेक्टर आणि कलाकारांनी काय करायचा तो आभ्यास केलेला असतो, पण तो नकळतपणे आपल्या अंतरंगात पोहचत राहतो.

चेहर्‍याचे हावभाव

आज आपल्याला एक अशी वेबसाईट पहायची आहे, जिचा वापर करुन आपण माणसाचे हावभाव रेखाटू शकतो, त्यांचा आभ्यास करु शकतो. Do2Learn च्या Facial Expressions या विभागाला आपण भेट देणार आहोत. त्यासाठी इथे क्लिक करा. यानंतर तुम्ही भेट द्याल त्या पानावर डाव्या बाजूला एक चेहरा असेल. तो दिसण्यासाठी तुमच्या संगणकावर ‘जावा’ असणं आवश्यक आहे. आपल्या संगणकावर जावा घेण्यासाठी या इथे क्लिक करा अथवा जावा घेण्यासाठीचे बटण त्या पानाच्या वर दिलेले आहेच!

तर आता Facial Expressions च्या पानावर डाव्या बाजूला तुम्हाला एक चेहरा दिसत आहे, असं म्हणायला हरकत नाही! वरच्या बाजूला afraid, interested, sad, ashamed, disgusted, surprized, happy, angry अशा प्रकारच्या भावना दिलेल्या आहेत आणि प्रत्येकासमोर एक रिकामा बॉक्स दिलेला आहे. बाजूला दिलेल्या चेहर्‍यावर समजा तुम्हाला interested ही भावना हवी आहे, तर interested च्या समोर असलेल्या रिकाम्या बॉक्सवर माऊसच्या सहाय्याने टिकमार्क करा. त्यानंतर चेहर्‍याच्या वरच्या बाजूला Reset हा पर्याय दिलेला आहे. त्याचा वापर करुन तुम्ही चेहरा पूर्ववत करु शकता.

आता चेहर्‍याच्या शेजारी उजव्या बाजूला काही पर्याय दिलेले आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही त्या चेहर्‍यावर हवी अशी भावना आणू शकता, देऊ शकता. त्यासाठी भुवया कशा असाव्यात?, डोळे, त्यांचा कटाक्ष कसा असावा?, तोंडाचा आकार, ओठांची रचना, चेहर्‍याची वर-खाली होणारी हालचाल, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःहून बदल करुन पाहू शकता. आणि तुम्ही काहीही बदल केलात तरी तो चेहरा मानवी संवेदनांच्या बाहेरचे उत्तर कधीच देणार नाही! त्या चेहर्‍यातून काही ना काही भावना ही व्यक्त होईलच. चला मग! एकदा ट्राय करुन पहा… तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, ज्यांना चित्रकलेची आवड आहे, तर त्यांना तुम्ही ही वेबसाईट दाखवू शकता. असं न्‌ तसं सुट्या सुरु झाल्याच आहेत. त्यांचीही थोडीशी करमणूक होईल, त्यातून काहीतरी शिकतील आणि विशेष म्हणजे दुपारच्या ऊन्हात गुणाने घरी बसतील.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.