जागतिक प्रमाणवेळ, टाईम झोन

र्वात आधी एकवेळ जरा वरच्या मेनूबारवर नजर फिरवा. ‘मराठी गाणी’ हा नवीन विभाग 2know.in वर आजपासून सुरु करण्यात आला आहे. पण ‘हा विभाग सुरु केला’, फक्त इतकंच सांगण्यासाठी मला माझा संबंध एक लेख वाया घालवायचा नाहीये… त्यामुळे आता आपण आपल्या आजच्या मूळ विषयाकडे वळूयात.

लहानपणी अर्थातच इंटरनेटची सुविधा काही उपलब्ध नव्हती. पण माझ्याकडे एक ऍटलास होता. भुगोलाच्या शिक्षकांनी तो आम्हाला घ्यायला लावलेला. तर त्या ऍटलास वरचे नकाशे आणि आकडेवारी पहात बसणं हे माझं अगदी मनापासून आवडणारं काम होतं. त्यावेळी आणि आजही तुम्ही मला ‘अमुक अमुक’ देशात आत्ता किती वाजले आहेत!? असं विचारलंत, तर मी लगेच त्याचं उत्तर देऊ शकेन. अक्षवृत्त, रेखावृत्त यांचा माझा चांगला आभ्यास आहे. आणि मग मी महाराष्ट्रातल्याच शहरांमध्ये किती मिनीटांचं अंतर आहे हे पहात बसायचो. अर्थात ते उन्हाळा आणि हिवाळ्यानुसार बदलत राहतं. तर हे मिनिटांचं अंतर पहाण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपलं ‘कालनिर्णय कॅलेंडर’. संकष्ट चतुर्थीच्या काही वेळा देलेल्या असतात ना! मागच्या बाजूला, त्या पहायच्या!

जागतिक प्रमाणवेळ

आज आपण अशा काही वेबसाईट्सची माहिती घेणार आहोत, जिथे आपण ‘जागतीक टाईमझोन’ पाहू शकणार आहोत. कोणत्या देशात, शहरात आत्ता किती वाजले आहेत!? कुठे आहे सकाळ?, कुठे दुपार, संध्याकाळ आणि रात्र? या सार्‍या गोष्टी आपल्याला लाईव्ह नकाशात पाहिल्याने समजू शकणार आहेत. तर मग याचा तुम्हाला उपयोग काय? एक म्हणजे सहज विरंगुळा आणि दुसरं म्हणजे सहज विरंगुळा करता करता आपल्या सामान्य ज्ञानात पडणारी भर. बाकी भुगोलातील या थोड्या मुलभूत गोष्टी माहित असणं आवश्यक आहे, असं मला वाटतं! तर मग खाली तुम्हाला मी अशा काही वेबसाईट्सची माहिती देत आहे, ज्या तुम्हाला याकामात उपयोगी पडतील. सर्वप्रथम यासंदर्भात उपलब्ध असणार्‍या मराठी वेबसाईटचा पत्ता दिला आहे, आणि मग बाकीच्या…

१. mar.timegenie.com
२. www.qlock.com/time
३. timeticker.com
४. www.worldtimezone.com
५. 24timezones.com
६. www.timezonecheck.com

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.