जीमेल ईमेल पाठवण्याची वेळ ठरवा, शेड्यूल ईमेल

खादा ईमेल लिहिल्यानंतर आपल्याला जर तो लगेच पाठवायचा नसेल, तो ठराविक दिवशी, ठराविक वेळी आपल्याला पाठवायचा असेल, अशावेळी आपण काय कराल? तो ठराविक दिवस आणि ती ठराविक वेळ लक्षात ठेवाल! पण आता असं काही करण्याची गरज नाही! लक्षात ठेवण्याची ही जबाबदारी आता ‘बुमरँग’ वर सोपवून टाका! ‘बुमरँग’ हे गुगलच्या ‘जीमेल’ या ईमेल सेवा पुरविणार्‍या साईट साठीचे फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन, क्रोम एक्सटेंन्शन आहे. ‘बुमरँग’ चा वापर करुन आपले ईमेल पूर्वनिर्धारीत वेळेवर आपोआप पाठवले जातील. त्यासाठी आपल्याला व्यक्तिशः त्या तिथे असण्याची काही गरज नाही. फायरफॉक्स ३.६ किंवा गुगल क्रोम ५.० आणि अधिक वापरुन आपण जीमेल, गुगल अ‍ॅप्स ईमेल मध्ये या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करु शकतो. त्यासाठी आपल्याला केवळ हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या वेब ब्राऊजर वर इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर जीमेल मध्ये त्याचा वापर कसा करायचा? हे आपण पाहणार आहोत.

१. सर्वप्रथम boomeranggmail.com या इथे आपल्याला जावं लागेल.
२. त्यानंतर Install Boomerang या लाल बटनावर क्लिक करा.
३. फायरफॉक्स ब्राऊजर च्या वर उजव्या बाजूस Allow वर क्लिक करुन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉलेशनची परवानगी द्या.
४. बुमरँग जीमेल साठी इन्स्टॉल करा. Install Now वर क्लिक करा.
५. आपला फायरफॉक्स वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा.
६. ब्राऊजर च्या एका टॅब मध्ये जीमेल उघडा. जीमेलच्या वरच्या बाजूस उजवीकडे आपणास ‘बुमरँग’ ची लिंक दिसेल.

जीमेल ची ईमेल वेळ ठरवण्यासाठी, शेड्यूल करण्यासाठी ‘बुमरँग’ वापरा

७. आपले ईमेल ठराविक वेळी पाठवायला, शेड्यूल करायला सुरुवात करा. इन्बॉक्स मधील मेसेज वाचत असताना ‘Boomerang’ बटन दिसेल, तर एखादा नवीन संदेश लिहित असताना ‘Send Later’ हे बटन दिसू लागेल.
८. मला वाटतं इन.कॉम चा मेल विभाग ही सुविधा फार पूर्वीपासून देत आहे. पण जीमेलच्या बाबतील ‘बुमरँग’ च्या सहाय्याने ईमेल शेड्यूल करणे आता शक्य होणार आहे. ‘बुमरँग’ वापरण्यासंबंधीत खाली देत असलेला व्हिडिओ आपल्याला मोलाची मदत करेल. ज्यांना ईमेल शेड्यूल करण्याची वेळोवेळी गरज पडते, त्यांनी ‘बुमरँग’ वापरायला काही हरकत नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.