टॉप १० साईट शोधा

मागे एकदा आपण ‘सिमिलर साईट्स’ या वेबसाईटबद्दल चर्चा केली होती. या वेबसाईटचा उपयोग करुन आपण एकाच प्रकारच्या अनेक वेबसाईट्स शोधू शकतो. म्हणजे हे एक प्रकराचं सर्च इंजिनच आहे, जे एकाच प्रकारच्या वेबसाईट्स शोधून त्यांना आपल्यासमोर हजर करतं.

आता ‘सिमिलर साईट’च्या ग्रुपमध्ये आणखी एका वेबसाईटची भर पडली आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे, ‘टॉपसाईट’! या वेबसाईटचा उपयोग अशावेळी होऊ शकतो, जेंव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रातल्या टॉपच्या, म्हणजेच अव्वल वेबसाईट्सची माहिती हवी आहे… जसं की त्यांच्या सर्च इंजिनच्या वर लिहिलं आहेच… Find the Top 10 Sites on the Web About: आणि आता खाली एक रिकामा बॉक्स दिला आहे! top 10 sites about…??? तुमच्या मनात असेल ते उत्तर त्या रिकाम्या बॉक्समध्ये टाकायचं आणि मग अव्वल वेबसाईट्सची यादी तुमच्यासमोर हजर होईल!

जसं की खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे मी त्या रिकाम्या बॉक्स मध्ये टाईप करत आहे ‘marathi’

आता Find Top Sites वर क्लिक केल्यानंतर खाली चित्रात दाखवलेल्या पानावर मी आलो आहे.

या पानावर मायबोली, मराठीब्लॉग्ज, मिसळपाव या मराठी वेबसाईट्सची यादी आहे. हे सारं काही आपण स्वतः ट्राय करुन पाहू शकता. पण एक गोष्ट मात्र इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, ही वेबसाईट अजून बीटा अवस्थेत आहे, त्यामूळे सर्च रिझल्टस्‌ पक्के असतीलच असं नाही! जसं जसं त्यांचे व्हिजिटर्स वाढत जातील, ते वेबसाईट्सना वोट्स देत जातील, तसं तसं येणार्‍या सर्च रिझल्टस ची विश्वसनीयता वाढत जाईल.

फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरणार्‍यांना त्यांचा टुलबारदेखील उपलब्ध आहे. शिवाय त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर Topic Cloud दिला आहे, त्या क्लाऊड मध्ये असलेल्या कोणत्याही शब्दावर क्लिक केल्यानंतर, त्या विषयाशी संबंधीत टॉप १० साईट्स ओपन होतील. पॉप्युलर १० साईट्स, टॉप सर्चेस इ. बटणेही त्यांनी उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा तुम्ही उपयोग करु शकता. कोणत्याही विषयाशी संबंधीत अव्वल १० वेबसाईट्स शोधायच्या असतील, तर ही वेबसाईट पुढे आपल्याला मदत करु शकेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.