नको असलेले ईमेल फिल्टर करा

जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांपासून दूर राहणं हे कधीकधी आवश्यक बनून जातं. अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींपासून ते इरिटेट करणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत! आत नको असलेले ईमेलच पहा ना! काय करायचं या ईमेल्सचं!? स्पॅम घोषीत करुन टाकायचं!? पण का!? मला मुळात ते माझ्या इन्बॉक्स मध्येच नको आहेत! अशावेळी मला काय करता येईल? त्यासाठीही एक पर्याय आहे ना! मेल फिल्टर करण्याचा! मेल फिल्टर करण्याची सुविधा मला वाटतं सर्वच ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या देतात. पण आजकाल जीमेल वापरणार्‍यांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि मी स्वतः जीमेल वापरत असल्याने आपण जीमेलच्या माध्यमातून नको असलेले ईमेल्स कसे फिल्टर करता येतील!? ते पाहणार आहोत.

१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जीमेल.कॉम वर जावं लागेल.
२. त्यानंतर वेळ येते ती नको असलेला मेल एकदा शेवटचा उघडण्याची! एख्याद्या व्यक्तिचा, संस्थेचा वारंवार येणारा, नको असलेला कोणताही एक मेल उघडा.
(मी खरं तर मी मराठी जीमेल वापरतो, पण आपल्यापैकी बहुतेक जण इंग्रजी जीमेल वापरत असल्याने काही काळासाठी मी माझ्या जीमेलची भाषा इंग्रजी करत आहे.)
३. तर आपण नको असलेला एक मेल उघडला आहे. मेलच्या वरच्या बाजूला More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा.

More actions मधून Filter messages like these या पर्यायावर क्लिक करा

४. यानंतर नको असलेला ईमेल फिल्टर करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
५. Next Step वर क्लिक करा.

Next Step वर क्लिक करा

६. Delete it या पर्यायावर टिक मार्क करा.

Delete it पर्यायावर टिक मार्क करुन Create Filter वर क्लिक करा

७. Create Filter वर क्लिक करा.
८. तुमचा फिल्टर तयार झालेला असेल. भविष्यात जर तुम्हाला हा फिल्टर काढून टाकावासा वाटला अथवा एडीट करावासा वाटला, तर तसं तुम्ही जीमेलच्या settings या पर्यायाद्वारे करु शकता. तिथे Filters नावाचा उपपर्याय तुम्हाला दिसून येईल. त्याचा याकामात उपयोग करा.

Settings मधून Filters एडीट करा

आता इरिटेट करणार्‍या, नको असलेल्या अशा व्यक्तिचा, संस्थेचा, संघटनेचा वारंवार येणार ईमेल परस्पर डिलिट होत राहिल. आणि त्यासाठी व्यक्तिशः तुम्हाला काहीएक करण्याची गरज उरणार नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.