नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करा
मराठी नवीन वर्ष जवळ आले आहे आणि म्हणूनच आज आपण तयार करणार आहोत…. एक इंग्रजी कॅलेंडर! 🙂 बघायला गेलं, तर अजूनही वेळ गेलेला नाहीये. आत्ता कुठे आपण मार्चच्या मध्यावर आलो आहोत. अजून बरेच महिने बाकी आहेत. आणि त्यापुढेही अनेक वर्ष बाकी आहेत. 🙂 कॅलेंडर तयार करण्यासाठी तशा खूप सार्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. पण मी त्याप्रमाणेच सांगत राहीन, ज्याप्रमाणे गेल्यावर्षी मी यावर्षीचं कॅलेंडर तयार केलं! हे सारं १-२-३ म्हणण्याइतकं सोपं आहे. सर्वात महत्त्वाची अट आहे ती इतकीच की, तुमच्या संगणकाला प्रिंटर जोडलेला असावा, जेणेकरुन तुम्ही तुमच्या कॅलेंडरची प्रिंट काढू शकाल.
१. ‘इयरली कॅलेंडर मेकर’ या वेबसाईटवर जा.
२. तुमच्या वार्षिक दिनदर्शिकेचा फॉरमॅट निवडा. तिथे ४ सुंदर फॉरमॅट दिले आहेत, त्यापॆकी एकाची निवड करा.
३. त्यानंतर तुमच्या दिनदर्शिकेसाठी २००९ पासून ते २०२० पर्यंतचं एक वर्ष निवडा.
४. तुमच्या संगणकावरील एखादे मनमोहक वॉलपेपर ब्राउज करा,
५. तुम्हाला जो चांगला वाटेल तो font निवडा.
६. शेवटी Generate वर क्लिक करा आणि पहा! PDF फॉरमॅट मध्ये तुमचं कॅलेंडर तयार झालं असेल!
७. तुमची दिनदर्शिका प्रिंट करा. आणि घरात एखाद्या चांगल्या ठिकाणी भिंतीवर चटकवून टाका.
दिनदर्शीका तयार करा |
एखाद्या वर्षी जर कोणीही तुम्हाला चांगली दिनदर्शिका भेट म्हणून दिली नाही, तर नाराज होऊ नका. 🙂 कारण आता तुम्ही स्वतःच स्वतःला हवी आहे तशी दिनदर्शिका तयार करु शकता!
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.