निरनिराळ्या वेब ब्राऊजर्स मध्ये वेबसाईट, ब्लॉग कसे दिसतात ते पहा

तुमच्या संगणाकावर असून असून असे किती इंटरनेट वेब ब्राऊजर्स असणार आहेत? १…२…५…??? मध्ये माझ्या संगणाकावर २ ओपेराच्या वेगवेगळ्या आवृत्या, सफारी, मोझिला, क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, स्लिम असे सात ब्राऊजर्स होते! पण ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स नक्कीच कोणाच्याही संगणकावर असणार नाहीत! आपला ब्लॉग किंवा आपली वेबसाईट सर्व इंटरनेट वेब ब्राऊजर्स वर नीट चालते का? ती त्यांवर कशी दिसते? हे पाहण्यासाठी आपला संगणक नक्कीच अपूरा पडतो.

मध्ये काय झालं माहीत नाही, पण मी साईट एडिटिंग करत होतो आणि कसल्यातरी एच.टी.एम.एल. (html) कोड्सची खेळत बसलो होतो. झालं! माझ्या संगणकाच्या ब्राऊजरवर माझी साईट नीट चालत राहीली, पण मोबाईलच्या ओपेरा ब्राऊजरवर तिचं कामकाज बिघडलं. कुठे चुक झाली!? काही कळेना… परत इंटरनेट एक्सप्लोरर च्या जुन्या आवृत्तीवर माझी साईट बघण्याचा योग आला तेंव्हाही तोच प्रकार! मग मात्र वॆतागून मी सगळंच डिलीट केलं आणि सर्व गोष्टींची पुर्नबांधणी केली. तेंव्हा कुठे सारं काही व्यवस्थित झाल्यासारखं वाटत आहे. आपली वेबसाईट पावलोपावली वाचकांच्या दृष्टीकोणातून तपासून पहावी लागते!

याचकामात आपल्याला अशी एक वेबसाईट मदत करु शकते, जी आपल्याला आपल्या वेबसाईटचा, ब्लॉगचा ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स मधील स्क्रिनशॉट दाखवेल! म्हणजेच आपली वेबसाईट ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स मध्ये कशी दिसते? ते ही वेबसाईट सांगेल, दाखवून देईल.

१. त्यासाठी प्रथम browsershots.org या वेबसाईटवर जा.
२. Enter url Here च्या समोर तुमच्या वेबसाईटचा, ब्लॉगचा पत्ता टाका. (http:// आणि www. सहीत!)
३. खाली कोणकोणत्या ब्राऊजर्समधील स्क्रिनशॉट हवा आहे? ते सांगा.
४. submitt वर क्लिक करा.

५. “Click here for results from previous screenshot requests:” असं लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल. त्याखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

क्रॉस ब्राऊजर टेस्टिंग – स्क्रिनशॉट्स

६. ही लिंक तुम्हाला स्क्रिनशॉट्स कडे घेऊन जाईल. निरनिराळ्या वेब ब्राऊजर्समध्ये तुमची वेबसाईट, तुमचा ब्लॉग, कसे दिसतात? ते तुम्हाला या वेबसाईटच्या मदतीने दिसून येईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.