फायरफॉक्स फ्रि मोबाईल वेब ब्राऊजर

फायरफॉक्स मोबाईल ब्राऊजरने मध्यंतरी धमाल उडवून दिली होती. कारण!? या ब्राऊजरच्या माध्यमातून कितीही नेटसर्फिंक केलं तरी बिलच पडत नव्हतं. हळू हळू ही ट्रिक खूपच प्रसिद्ध झाली आणि उघडपणे ती नेटवर सर्वत्र सांगितली जाऊ लागली. अर्थातच ती मग एअरटेलवाल्यांनाही कळालीच असणार! म्हणूनच ह्या स-याची परिणीती शेवटी हे ब्राऊजर वापरुनही बिल पडण्यात होऊ लागली.

तरीही सुमारे सात- आठ महिनेतरी मी हे ब्राऊजर वापरुन मोबाईलवरुन मनोसोक्त नेटसर्फिंग केलं. डाऊनलोड काही करता येत नव्हतं, पण नेटवर उपलब्ध असलेले माहितीपूर्ण लेख वाचून वाचूनच मी खूप काही शिकलो.

हे ब्राऊजर ओपेराइतकं डेव्हलप झालेलं नसलं तरी याची बेसिक कार्यप्रमाणाली ही काहिशी ओपेरासारखीच आहे. म्हणजे जसं एखादी वेबसाईट आधी फुल स्र्किन दिसणं…अगदी कॉम्प्युटरवर दिसते तशी! आणि मग आपल्याला त्या वेबसाईटच्या हव्या असणा-या भागावर झुम करता येणं!  फायरफॉक्स या ब्राऊजरला टि-शार्क असंही नाव आहे. टि-शार्क अथवा फायरफॉक्स हे दोनही ब्राऊजर एकच आहेत.

तुम्हाला हा ब्राऊजर जर वापरुन पाहायचा असेल तर तो या इथे मिळेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.