फेसबुकवर अदृष्य चॅट (Invisible Chat) कसा करता येईल?

पल्यापैकी अनेकांना आपल्या गोपनियतेविषयी काळजी असते आणि आपल्या चॅट खिडकीमध्ये ऑनलाईन दिसणार्‍या काही लोकांना आपण दिसू नये असं त्यांना वाटत असतं. अदृष्य राहिल्याने आपल्याला केवळ हव्या अशाच लोकांबरोबर बोलण्यास सुरुवात करता येते. अशावेळी त्याक्षणी आपल्याला ज्या लोकांबरोबर बोलायचं नाही अशा लोकांचा अडथळा येत नाही.
गुगल टॉक मध्ये अदृष्य राहण्याची अशी सुविधा दिसून येते आणि आपण आपल्या जीमेल चॅट मध्ये किंवा जीटॉक मध्ये अदृष्य (Invisible) राहता येतं. पण फेसबुक आपल्याला थेट असा पर्याय देताना दिसून येत नाही. आपण एक तर ऑनलाईन जाऊ शकतो अथवा ऑफलाईन. मला फेसबुकबाबत ही गोष्ट आवडत नव्हती, आणि म्हणूनच मला त्यावर काहीतरी उपाय हवा होता. मला हा उपाय मिळाला! फेसबुकवर असा चॅट करणं हे अगदी सोपं आहे आणि अदृष्य (इन्व्हिजिबल) चॅट पेक्षाही चांगलं आहे. कसं!? ते आपण पाहूयात.

इथे आपण सर्वांसाठी पूर्णपणे अदृष्य रहात नाही. आपण केवळ त्या लोकांसाठीच अदृष्य रहाल, ज्या लोकांबरोबर आपल्याला बोलायचं नाहीये. आणि अशा लोकांनाच आपण दिसाल, ज्यांच्याबरोबर आपल्याला चॅट करायचा आहे. यालाच आपण फेसबुकवरील अदृष्य चॅट असं देखील म्हणू शकतो.
फेसबुकवर अदृष्य (Invisible) चॅट कसा करता येईल?
फेसबुकवर अदृष्य चॅट करणं हे खूपच सोपं आहे. आपणाला ज्या लोकांबरोबर बोलायचं नाही, त्यांना आपण ऑफलाईन दिसाल आणि ज्यांच्याबरोबर आपल्याला बोलायचं आहे, त्यांनाच आपण ऑनलाईन दिसाल. हे जीमेल वरील इन्व्हिजिबल (Invisible) चॅट प्रमाणे आहे. पण जीमेलवर जसं आपण सर्वच लोकांना ऑफलाईन दिसतो, तसं फेसबुक मध्ये ज्यांच्याबरोबर बोलायचं नाही अशा केवळ ठराविक लोकांनाच आपण ऑफलाईन दिसणार आहोत. फेसबुकवर अदृष्य चॅट कसा करता येईल? खाली त्याबाबत सांगण्यात आलं आहे.

फेसबुक चॅट सेटिंग्ज
 1. आपलं फेसबुकचं खातं उघडा. म्हणजेच फेसबुकवर जा आणि लॉग इन व्हा. फेसबुकवर उजव्या बाजूला तळाशी आपल्याला चॅटची खिडकी दिसून येईल (Chat Window).
 2. आपण जर ऑफलाईन असाल, तर त्यावर क्लिक करा आणि ती खिडकी उघडा. या चॅट खिडकीमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाने एक चक्र आपणास दिसून येईल. त्या चक्रावर क्लिक केल्यास चॅट सेटिंग आपल्याला दिसून येतील.
 3. तिथे तीन पर्याय देण्यात आलेले आहेत. “Available to Chat”, “Chat Sounds” आणि “Limit Availability…”. त्यापैकी “Limit Availability” या पर्यायावर क्लिक करा.
 4. एक नवीन खिडकी उघडली जाईल. या खिडकीत आपल्याला खाली दुसर्‍या चित्रात दाखवल्याप्रमाणे आणखी नवे पर्याय दिसून येतील. तिथे निवडण्यासाठी दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. हे दोन्ही पर्याय अगदी एकसारखंच काम करतात, पण त्यांचे मार्ग हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. “Make me unavailable to:” (मी या लोकांना ऑनलाईन दिसू नये:) आणि “Only make me available to:” (मी या लोकांना ऑनलाईन दिसावं:) हे ते दोन पर्याय आहेत. हे दोन पर्याय कोणतं काम करतात? ते पर्याय वाचूनच आपल्याला समजू शकतं.
 5. या दोन पर्यायांखाली आपल्याला काही ‘फेसबुक लिस्ट’ दिसून येतील. त्यापैकी काही लिस्ट डिफॉल्ट आहेत. म्हणजेच फेसबुक कडून आधीपासूनच तयार करण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या लिस्ट या आपण तयार केलेल्या फेसबुक लिस्ट आहेत (जर आपण फेसबुक लिस्ट तयार केल्या असतील.). फेसबुक लिस्ट डिफॉल्ट असेल अथवा आपण स्वतः तयार केलेली असेल, पण या प्रत्येक लिस्ट मध्ये मात्र कोणत्या व्यक्ति आहेत? याचं पूर्ण नियंत्रण आपल्याकडे असतं.
 6. हा एक मार्ग आहे, ज्या माध्यमातून आपण केवळ आपणास हव्या अशाच लोकांना ऑनलाईन दिसू शकतो. आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं ते लक्षात ठेवा. आपलं निम्मं काम झालं आहे. आता उरलेलं निम्मं काम कसं करायचं? ते आपण पाहणार आहोत.
फेसबुक चॅट:  फेसबुक लिस्टच्या माध्यमातून आपली उपलद्धता ठरवा

फेसबुकवर अदृष्य चॅट: चॅट लिस्ट तयार करा
 1. डाव्या बाजुच्या साईडबार मधून Lists समोरील More हा पर्याय निवडा. इथे आपल्यासाठी थेट पत्ता आहे, “फेसबुक लिस्ट्स्‌“. आपण आत्ता फेसबुक लिस्ट्स्‌ च्या पानावर आहात. नवीन लिस्ट तयार करण्यासाठी “+ Create a List” वर क्लिक करा. त्या लिस्टला एखादं नाव द्या, जसं “Chat”. Chat हे नाव या नवीन लिस्टसाठी ठिक आहे, कारण मग आपण आपले फेसबुक वरील दृश्यमान ठरवत असताना, ही लिस्ट शोधनं आपल्याला सोपं जाईल.
 2. आपल्याला ज्यांच्याबरोबर नेहमी चॅट करायला आवडतं, अशा काही मित्रांचा या चॅट लिस्ट मध्ये समावेश करा.
 3. आधीच्या निम्या भागात सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा एकदा फेसबुक चॅट सेटिंग्ज मध्ये जा. “Make me unavailable to:” असं तिथे आधिपासूनच निवडलेलं असेल. त्याखालील “Only make me available to:” याची निवड करा. आणि आता या पर्यायाखालील “Chat” या लिस्टची निवड करा (टिक मार्क). ही लिस्ट आपण पायरी क्रमांक १ मध्ये तयार केलेली आहे. आता सरतेशेवटी “Okay” वर क्लिक करा.
 4. आता आपण केवळ त्याच लोकांना दिसत आहात, ज्या लोकांचा समावेश या “Chat” लिस्ट मध्ये आहे. या लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवून आपण विशिष्य हव्या अशा लोकांपर्यंत आपलं दृश्यमान मर्यादित ठेवू शकतो. 
 5. आपणाला ज्या लोकांबरोबर चॅट करायचा आहे, अशा लोकांना त्या लिस्टमध्ये समाविष्ट करा. आणि आपल्याला ज्या लोकांबरोबर त्याक्षणी चॅट करायचा नाहीये, अशा लोकांना त्या लिस्ट मधून काढून टाका. आपण केवळ त्याच लोकांना दिसू लागाल, ज्या लोकांचा या लिस्ट मध्ये समावेश आहे.
अशाप्रकारे आपण फेसबुकवर इन्व्हिजिबल (Invisible) चॅट, अदृश्य चॅट करु शकतो. असं करण्याने फेसबुकवर आपली गोपणीयताही जपली जाईल आणि आपल्याला चॅटिंगचा खरा आनंदही मिळू शकेल. हे सर्व करत असताना आपल्याला चॅट खिडकी संदर्भात काही समस्या आली, तर घाबरुन जाऊ नका. या लेखाच्या खाली कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधा. मी आपल्याला त्यावरील उपाय सांगेन.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.