फेसबुक अल्बम डाऊनलोड करा

फेसबुक वरचा फक्त एखादा दुसरा फोटोच नाही तर संपूर्ण अल्बम एका क्लिकमध्ये डाऊनलाड कसा करता येईल!? ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे समजा एखाद्यावेळी तुमच्या मित्राचा संपूर्ण अल्बम पहात बसायला तुमच्याकडे वेळ नसला, तरीही मग तो अल्बम तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करुन नंतर पाहू शकता. त्यासाठी काय कारावं लागेल ते मी खाली सांगत आहे.

१. त्यासाठी सर्वप्रथम तुमचा ‘फायरफॉक्स’ वेब ब्राऊजर ओपन करा.
२. आता FacePAD हे ऍड-ऑन तुमच्या फायरफॉक्स वेब ब्राऊज्रमध्ये ऍड करा.
३. टर्मस आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करा.
४. FacePAD प्लग-इन इंन्स्टॉल केल्यानंतर आपला वेब ब्राऊजर बंद करुन परत ओप्न करा, रिस्टार्ट करा.
५. आपल्या वेब ब्राऊजरच्या Tools – Add-ons या पर्यायावर जा.
६. FacePAD च्य पर्यायावर माऊसच्या कर्सरची एक टिचकी मारा.
७. FacePAD च्या options वर क्लिक करा. हवे असल्यास तिथे दिलेल्या पर्यायात बदल करा.
८. आता आपले फेसबुकचे खाते ओपन करा.
९. कोणत्याही फोटो अल्बम वर राईट क्लिक करा.

फेसबुक अल्बम डाऊनलोड

१०. आणि Download Album with FacePAD वर क्लिक करा.

अशाप्रकारे कोणत्याही फेसबुक अल्बमचे डाऊनलोडिंग क्षणार्धात सुरु होईल. FacePAD हे फारफॉक्सचे एक उपयुक्त ऍड-ऑन आहे!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.