ब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल?

ध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच उरली नाही. पर्वाच माझ्या एका ब्लॉगचे रुप पालटत असताना मी ब्लॉगरच्या या नवीन सुधारणेबाबत माहिती घेतली. ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स बाबत सुधारणा केल्याचं यापूर्वीच मला माहित होतं, पण याआधी तिकडे फिरकण्याची गरज कधी निर्माण झाली नव्हती. ब्लॉगरच्या टेम्प्लेट्स  बाबत लिहायचं म्हटलं, तर त्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण आजचा तो आपला विषय नाहीये. आज आपण पाहणार आहोत की, ब्लॉगर सोडून, बाहेरुन, एखाद्या दुसर्‍या साईटवरुन घेतलेली टेम्प्लेट ब्लॉगर ब्लॉगला कशी देता येईल!? बाहेरील साईटवरुन घेतलेल्या सुंदर टेम्प्लेट्स आपल्या ब्लॉगला देणं हे खूपच सोपं आहे.

सर्वप्रथम आपल्याला अशा साईटचा शोध घ्यायचा आहे, जी आपल्याला मोफत ब्लॉगर टेम्प्लेट्स पुरवेल. गुगल सर्च इंजिन मध्ये जाऊन आपण त्यासाठी ‘free blogger templates’ अशा आशायचा शोध घेऊ शकतो. पण आता प्रस्तुत लेखाच्या संदर्भात आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील ‘BEAUTIFUL BLOG TEMPLATES’ या टेम्प्लेट संबंधीत ब्लॉगचा उल्लेख करुयात. तर या ब्लॉगवर जाऊन आपल्या आवडीचं कोणतंही एक टेम्प्लेट निवडा आणि ‘Download Here’ या बटणावर क्लिक करा. मग आपण जाल ziddu.com वर. तिथे परत फाईलच्या खाली ‘Download’ वर क्लिक करा, व्हेरिफिकेशन कोड द्या आणि मग परत डाऊनलोड बटणावर क्लिक करा. फाईल शक्यतो डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणजे ती सापडायला सोपे जाईल.

सरतेशेवटी आपल्या संगणकावर आता ‘एकावर एक तिन पुस्तंकं’ अशा चिन्हाची ‘WinRAR ZIP archive’ फाईल आहे. त्यावर आपला माऊस नेऊन राईट क्लिक करा. आणि मग ‘Extract Here’ वर क्लिक करा. त्याच फाईलच्या खाली एक नवीन फोल्डर आपल्याला दिसू लागेल. त्यावर क्लिक करुन तो उघडा. त्यात ‘xml Document’ नावाची एक फाईल असेल. ब्लॉगर ब्लॉगचे टेम्प्लेट बदल्यासाठी आपल्याला नेमकी हीच फाईल हवी आहे.

यानंतर आपल्या वेब ब्राऊजर मध्ये ब्लॉगर.कॉम उघडा. ज्या ब्लॉगची टेम्प्लेट बदलायची आहे, त्या ब्लॉगच्या ‘Design’ या विभागात जा.  त्या तिथून Edit HTML या पर्यायावर क्लिक करा. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे (मोठ्या आकातात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा, ते चित्र नवीन टॅबमध्ये उघडेल.) सर्वप्रथम ‘Download Full Template’ वर क्लिक करुन आपल्या ब्लॉगसाठी सध्याच्या क्षणी अस्तित्त्वात असणारे टेम्प्लेट संगणकावर डाऊनलोड करुन घ्या. हे अशासाठी की, समजा टेम्प्लेट बदलत असताना काही घोटाळा झाला, तर आपल्याकडे आपल्या जुन्या टेम्प्लेटचा ‘बॅक अप’ असावा. आपल्या ब्लॉगचा असा वेळोवेळी ‘बॅक अप’ ठेवत चला. जेणेकरुन ब्लॉगच्या प्रसारणात काही घोळ झाला, error आली, ..ब्लॉगवर प्रयोग करत असताना असं काहीही होऊ शकतं, अशावेळी आपल्याकडे आपल्या ब्लॉगचा ‘बॅक अप’ असणं अत्यंत आवश्यक आहे.

ब्लॉगर डिझाईन आणि त्यात HTML एडिटर इथे आहे

मूळ टेम्प्लेट डाऊनलोड करा आणि नवीन टेम्प्लेट अपलोड करा

आपण आपल्या ब्लॉगर ब्लॉग टेम्प्लेटचा बॅक अप घेतला आहे. आता परत चित्रात दाखवल्याप्रमाणे Browse या बटणाच्या सहाय्याने काही वेळापूर्वी डाऊनलोड केलेल्या नवीन टेम्प्लेटची ‘xml Document’ फाईल आत घ्या, अपलोड करा. ‘क्रोम वेब ब्राऊजर’ वर मला वाटतं Browse च्या ठिकाणी Choose File हा पर्याय दिसतो. ‘क्रोम वेब ब्राऊजर’ वापरणार्‍यांनी टेम्प्लेटची  ‘xml Document’ फाईल अपलोड करण्यासाठी त्या पर्यायाचा वापर करावा.

आपली  ‘xml Document’ फाईल अपलोड झाली असेल. आता केवळ एकच काम उरलं आहे, ते म्हणजे ‘Save Template’ या बटणावर क्लिक करणं! टेम्प्लेट सेव्ह करताच आपल्या ब्लॉगला हवं होतं ते नवीन रुप मिळालेलं असेल. View Blog वर क्लिक करुन आपण ब्लॉगचं हे बदलेलं स्वरुप पाहू शकता.

या सर्व गोष्टी करत असताना काही चुक झाल्यास, किंवा नवीन ब्लॉग टेम्प्लेट प्रत्यक्ष पाहताना मनासारखी न वाटल्यास मागे डाऊनलोड केलेली ब्लॉगची मूळ टेम्प्लेट अपलोड करुन सेव्ह करावी. याने आपला ब्लॉग पूर्ववत होईल, त्यामुळे काळजी करण्याचं काही एक कारण नाही. आता निश्चिंतपणे आपला ब्लॉग अधिक सुंदर कराता येतो का ते पहा!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.