मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश

मागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं आता गुगलने आपला ‘गुगल शब्दकोश’ बंद केला असून, ‘गुगल ट्रांसलेट’ वर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. पण मराठी-इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगलचा शब्दकोश हा ऐकमेव पर्याय नसून, यासंदर्भातील इतर काही उपयुक्त साईट्स नुकत्याच माझ्या पाहण्यात आल्या आहेत. त्या सर्व साईट्स आपण एक एक करुन आजच्या लेखात थोडक्यात पाहणार आहोत. इंटरनेटवर एखादा इंग्रजी मजकूर वाचत असताना, जर आपल्याला एखादा शब्द अडला किंवा इंग्रजी लिहित असताना मनातील एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ आपल्याला इंग्रजीमधून हवा असल्यास, आपल्याला  या ऑनलाईन मोफत शब्दकोशांचा उपयोग होऊ शकेल. तर आता आपण एक एक करुन या शब्दकोशांची माहिती घेऊयात.
१० मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी ऑनलाईन शब्दकोश
‘शब्दकोश.कॉम’ च्या मराठी विभागात आपण मराठी-इंग्रजी अर्थ समजून घेऊ शकतो. नोव्हेंबर २००३ सालापासून या साईटची सुरुवात झाली असून, ही साईट मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करते. साईटच्या उजव्या बाजूस वर आपल्याला एक सर्च बॉक्स दिसून येईल, त्यात मराठी किंवा इंग्रजी शब्द टाकून शोध घेतल्यास आपल्याला हवा असलेला शब्द प्राप्त होईल. आपल्याला जर मराठी टाईप करता येत नसेल, तर KEYBOARD ची व्यवस्था देखील करुन देण्यात आली आहे.
‘श्रीधर गणेश वझे’ यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश वर नमूद केलेल्या पत्यावर उपलब्ध आहे. ‘द आर्यभुषण स्कूल डिक्शनरी’ असे या शब्दकोशाचे नाव आहे. अधिक अचूक शोध घेण्यासाठी सर्च बॉक्स खाली दिलेल्या पर्यायांचा देखील विचार करावा.
‘अ डिक्शनरी, मराठी अँड इंग्लिश’ नावाचा ‘जे.टी.मोल्सवर्थ’ यांचा शब्दकोश आपल्याला वरील पत्यावर ऑनलाईन वापरता येईल. दिलेल्या रिकाम्या जागेत मराठी अथवा इंग्रजी शब्द लिहून शोध घेतल्यास आपल्याला हवा तो शब्द व अर्थ, हव्या त्या भाषेत प्राप्त होईल.
अ. dicts.info/dictionary.php?l1=English&l2=Marathi – इथून इंग्रजी शब्दांचा मराठी अनुवाद करता येईल.
ब. dicts.info/dictionary.php?l1=Marathi&l2=English – इथून मराठी शब्दांचा इंग्रजी अनुवाद करता येईल.
या इंग्लिश मराठी शब्दकोशाबाबत मला वाटतं अनेकांना आधिपासूनच माहित असेल. ‘खंडबहाले’ या शब्दकोशामागची पार्श्वभूमी आपल्याला या इथे वाचायला मिळेल. खंडबहालेचे मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे मोबाईल सॉफ्टवेअर देखील आहे, पण ते मोफत नसून त्यासाठी आपल्याला २०० रुपये द्यावे लागणार आहेत.
‘ई शब्दकोश’ आपल्याला इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ शोधण्यास सहाय्य करतो. पण हा शब्दकोश वापरुन आपल्याला एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत नीट दिसत नसल्यास, त्याबाबतची मदत या इथे उपलब्ध आहे.
‘मराठी डिक्शनरी’ हा देखील एक ऑनलाईन संपूर्ण मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश आहे. शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला या शब्दकोशाचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपण एक एक करुन शब्दांचे अर्थ जाणून घेऊ शकाल, अथवा शोध बॉक्सचा उपयोग करुन नेमक्या शब्दाचा अर्थ जाणून घेता येईल.
‘तमिळक्यूब’ या साईटवर आपल्यासाठी एक ऑनलाईन मराठी-इंग्रजी शब्दकोश उपलब्ध आहे. तिथल्या सर्च बॉक्सचा वापर करुन आपण आवश्यक त्या शब्दांचे अर्थ आपल्याला हव्या असलेल्या भाषेत मिळवू शकतो.
मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश
इंडियन डिक्शनरी या इथे देखील एक अतिशय उत्तम असा इंग्रजी मराठी, मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. मेनू मधील DICTIONARIES हा टॅब उघडून आपण मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी असा शब्दकोशामध्ये बदल करु शकतो. दिलेल्या रिकाम्या जागेत शब्द टाकून आपण त्या शब्दाचा अर्थ प्रतिभाषेत शोधता येईल.
वरील पत्यावर आपल्याला ‘वेबस्टर’ चा ऑनलाईन मराठी शब्दकोश आढळून येईल. हाही एक समृद्ध असा शब्दकोश असून, या शब्दकोशाचा आपल्याला आपल्या कामात नक्कीच उपयोग होऊ शकेल.
ही काही ऑनलाईन मराठी शब्दकोशांची यादी होती. याव्यतिरीक्त ऑनलाईन मराठी शब्दकोशांचे काही दुवे जर आपल्याला माहित असतील, तर त्यांची माहिती आपण खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून देऊ शकाल. ही माहिती सर्व मराठी लोकांसाठी आवश्यक आणि उपयुक्त आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.