मॅगझिन कव्हर तयार करा

तुम्हाला आपल्या मित्राची थोडीशी गंमत करायची आहे!? सुपरस्टार व्हायचं आहे? आज आपण पहाणार आहोत, एखाद्या मॅगझिनच्या, नियतकालिकाच्या कव्हरपेजवर स्वतःला कसं आणायचं?

मॅगझिन कव्हर तयार करण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत, पण आपण पाहणार आहोत ‘बिग ह्युज लॅब’ या वेबसाईटच्या सहाय्याने आपल्याला ते कसं तयार करता येईल?

मॅगझिन कव्हर तयार करा

सर्वप्रथम ‘बिग ह्युज लॅब’ या वेबसाईटवर जा. तुम्हाला तुमच्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर हवा आहे, असा एक फोटो निवडा. शक्यतो तो तुमचाच एखादा चांगलासा फोटो असावा. आता बाकी ऑप्शन्स काय सांगत बसू!? हवी अशी लेआऊट निवडा, दिलेल्या मोकळ्या जागांत हवा तो मजेशीर टेक्स्ट भरा. तुम्ही भरलेला टेक्स्ट मॅगझिनवर कुठे दिसेल!? ते उजव्या बाजूला असलेल्या मॅगझिनच्या चित्रात पाहून समजेल.

Create वर क्लिक करा आणि पहा! तुमचं स्वतःचं मॅगझिन कव्हर तयार झालं आहे!  …जर मनासारखं जमलं नसेल, तर तुम्ही त्याला परत एडिट करु शकता. आणि जर मनासारखं जमलं असेल, तर डाऊनलोड करुन घ्या किंवा एखाद्या कम्युनिटीवर शेअर करा. अशाप्रकारे मॅगझिन कव्हर तयार करणे हा एक मजेशीर अनुभव आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.