मोठ्या आकाराची फाईल पाठवा

नेकदा ईमेल ऍटॅचमेंटचा वापर करुन आपल्याला मोठ्या आकाराच्या फाईल्स सेंड करता येत नाहीत. जीमेलचा वापर करुन मला वाटतं आपण काहीतरी जास्तितजास्त २५ MB च्या फाईल्स सेंड करु शकतो, तेही समोरचा जर जीमेल वापरत असेल तर!

आणि मग आपल्या मित्राला एखादे गाणे पाठवायचे असेल किंवा व्हिडिओ पाठवायचा असेल, अशावेळी गरज भासते ती एका माध्यमाची जे आपल्याला अशा मोठ्या आकाराच्या फाईल्स सेंड करण्यास मदत करेल.

*  इंटरनेट वरील अशा माध्यमात सर्वप्रथम समावेश होतो तो transferbigfiles.com या वेबसाईटचा.
१. transferbigfiles.com वर जा.
२. त्या वेबसाईटवरील पर्याय १ द्वारे १ GB इतक्या आकारापर्यंतची कोणतीही फाईल निवडा.
३. ही फाईल कोणाला पाठवायची आहे, त्यांचे पत्ते त्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या पर्याय क्रमांक २ द्वारे तुम्ही टाकू शकता.
४. टिक मार्क करुन, रिकाम्या चौकोनात क्लिक करुन ‘अटी मान्य करा’ आणि त्यानंतर send it! वर क्लिक करा.

* मोठ्या आकाराची फाईल सेंड करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे sendthisfile.com. पण यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर रजिस्टर व्हावं लागेल! त्यांनी त्यांच्या मुख्य पानावर सांगितलं आहे की,
• No file size limit!
• No limit on files sent!
• Security same as email!

म्हणजेच sendthisfile.com वापरुन तुम्ही कोणत्याही आकाराची फाईल पाठवू शकता, अशा कितीही फाईल पाठवू शकता आणि यासाठी तुम्हाला ईमेल इतकीच सुरक्षितता प्राप्त होईल.

* आता sendspace.com काय करु शकतं ते आपण पाहुयात!

sendspace.com वापरुन आपण ३०० MB पर्यंतच्या फाईल्स पाठवू शकतो.

त्यासाठी sendspace.com या वेबसाईटवर जा. Browse या बटणावर क्लिक करुन आपल्या संगणकावरील कोणतीही एक फाईल निवडा. हवं असल्यास फाईल बाबत काही माहिती लिहा. ही फाईल कोणाला पाठवायची आहे!? त्याचा ईमेल पत्ता द्या, गरज वाटल्यास आपला ईमेल पत्ता द्या आणि मग Upload File वर क्लिक करा.

समोरच्या व्यक्तिला एक ईमेल जाईल ज्यात तुमची फाईल डाऊनलोड करुन घेण्य़ासाठी एक लिंक देलेली असेल.

मोठ्या आकाराची फाईल सेंड करा

* dropsend.com चा वापर करुन तुम्ही २ GB पर्यंतच्या फाईल्स सेंड करु शकाल!
* मोठ्या आकाराच्या फाईल्स सेंड करण्यासाठी आणखीही काही वेबसाईट्स आहेत, त्यांची नावे आपण पाहूयात.
१. gigasize.com
२. sendbigfiles.com
३. largefilesasap.com
४. filemail.com
५. yousendit.com

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.