मोफत ऑनलाईन mp3 कटर

मागे एकदा मी माझ्या मोबाईलसाठी रिंगटोन मेकर सॉफ्टवेअर विकत घेतलं होतं. मी स्वतः विकत घेतलेल्या सॉफ्टवेअर्समध्ये ते एकमेवच म्हणावं लागेल! पण त्यालाही बरेच लिमिटेशन्स होते. म्हणजे ठरावीक bitrate ची mp3 फाईलच रिंगटोन तयार करण्यासाठी, त्या रिंगटोन मेकर मध्ये चालत होती. त्यामुळे बर्‍याचदा मला हव्या त्या गाण्याची रिंगटोन तयारच करता येत नव्हती. शेवटी ते एक मोबाईल सॉफ्टवेअर होतं…

आज आपण पाहणार आहोत, एकाद्या mp3 गाण्याचा हवा असलेला भाग कट कसा करायचा? तेही ऑनलाईन! मीही आत्ता इथे सांगता सांगता तुमच्या बरोबरच हा प्रयोग करुन पाहणार आहे.

१. सर्वप्रथम आपल्याला http://cutmp3.net/ या वेबसाईटवर जावं लागेल.
२. थोडावेळ थांबल्यानंतर Open MP3 हे बटण दिसेल, या बटणावर क्लिक करुन मी एक गाणं माझ्या संगणकारुन या वेबसाईटवर घेतलं आहे.
३. Play वर क्लिक केल्यानंतर मी निवडलेलं गाणं वाजायला सुरुवात झाली आहे.
४. माझ्या संगणकाच्या mp3 प्लेअरमध्येही तेच गाणं लावून त्या गाण्यातला माझा आवडता भाग किती मिनिट सेकंदांपासून ते किती मिनिट सेकंदांपर्यंत आहे, हे मी लक्षात ठेवलं आहे.

एम.पी.३

५. आता स्टेप ३ मध्ये मी जिथे ऑनलाईन Play वर क्लिक केलं होतं, तिथेच Pause वर क्लिक करत आहे.
६. Pause केल्यानंतर Splitted File Size च्या खाली मी स्टेप ४ मध्ये लक्षात ठेवलेली वेळ टाकली आणि Cut वर क्लिक केलं. (आधी हवी ती वेळ टाकायची आणि मग 00 (शून्य) काढून टाकायचे.)
७. mp3 मधून हवा असलेला भाग कट झालेली फाईल माझ्या संगणकावर मी सेव्ह केली.

आत्ता जवळपास कुठेतरी मोठ्या डॉल्बीवरुन जबरदस्त बिट्स ऎकू येत आहे. 

Music is the poetry of the air ~ Richter

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.