मोबाईलवरुन मोफत Sms सेंड करण्याचे सॉफ्टवेअर

मोफत SMS सेंड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारी 160by2 ही वेबसाईट तर आपणास माहितच असेल. आता आपण समजून घेणार आहोत, 160by2 ने उपलब्ध करुन दिलेले सॉफ्टवेअर कोठे मिळेल? आणि त्याचा मोफत SMS सेंड करण्यासाठी कसा उपयोग करुन घेता येईल?

सारं काही अगदी सोपं आहे. ब्रदरसॉफ्ट साईटच्या या लिंकवर तुम्ही जा. तिथून तुम्हाला ते सॉफ्टवेअर कॉंम्प्युटर आणि त्यानंतर मोईलवर डाऊनलोड करून घेता येईल. नाहितर थेड तुमच्या मोबाईलवरुन 160by2 च्या मोबाईल साईटवर जा आणि तिथून ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घ्या.

त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या GPRS कनेक्शन द्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरील 160by2 च्या सॉफ्टवेअरशी कनेक्ट व्हा. त्यानंतर दोन रकाने दिसतील…एक म्हणजे मोबाईल नंबर टाईप करण्यासाठी आणि दुसरा असेल तो तुमचा मेसेज टाईप करण्यासाठी. हे सॉफ्टवेअर वापरुन तुम्ही केवळ ६० कॅरॅक्टरचाच SMS पाठवू शकता. याहून अधिक कॅरॅक्टरचा SMS पाठवण्यासाठी मात्र तुम्हाला त्यांच्या मूळ वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल. तुमच्या मोबईलच्या फोन डिरेक्टरिटत सेव्ह असलेले कॉन्टॅक्टस तुम्ही SMS सेंड करण्यासाठी डायरेक्ट वापरु शकता अथावा तुम्ही 160by2 च्या वेबसाईटवर सेव्ह केलेले कॉंन्टॅक्टसही वापरु शकता.

आता प्रश्न उरतो तो असा की, या सॉफ्टवेअरचा उपयोग जर GPRS कनेक्शन शिवाय करता येत नसेल तर त्याला मोफत कसं काय म्हणता येईल? तर त्यावर एक पर्याय आहे, तो म्हणजे एक अशी युक्ती वापरण्याचा की, जेणेकरुन मोबाईलवरुन मोफत GPRS वापरता येईल. कसं काय!? ते पाहूयात पुढच्या भागात.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.