यु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट

पला आजचा विषय आहे यु ट्युब मुव्हीज. इतके दिवस आपण यु ट्युबवर मुव्हीज पाहू शकत होतोच, पण ते सारे मुव्हीज अनऑफिशिअल होते, म्हणजेच कोणीतरी ते असंच इल्लिगली टाकलेले असायचे. एखादा चित्रपट सिनेमागृहात आल्या आल्या त्याची थिअटर प्रिंट १०-१० मिनिटांच्या भागात यु ट्युबवर अवतरायची आणि मग ही गोष्ट यु ट्युबच्या लक्षात आल्यावर, तो सिनेमा यु ट्युबवरुन काढण्यात यायचा. बाकी यु ट्युबवरुन अद्याप न काढण्य़ात आलेले सिनेमे देखील अनेक आहेत.

इंटरनेट बाबत विशेष अनुभव नव्हता तेंव्हा, म्हणजेच काही वर्षांपूर्वी, मी ब्रायन ऍडम्स आणि बॅकस्ट्रिट बॉईजची गाणी यु ट्युबवर टाकली होती, तेंव्हा वॉर्निंग देऊन अशी गाणी काढून टाकण्यास यु ट्युबने मला सांगितलं होतं. मग काय करतोय? काढून टाकली सगळी गाणी. पण एक गोष्ट मला अजूनही कळत नाही… ती अशी की, गाणी अपलोड करणारा यु ट्युबवर मी काही एकटा युजर नव्हतो, तेंव्हा यु ट्युबने मलाच तशी वॉर्निंग का बरं दिली असावी? कदाचीत कोणीतरी तक्रार केल्याशिवाय यु ट्युब स्वतः काही ऍक्शन घेत नाही.

ऑनलाईन चित्रपट

असो… यु ट्युब वर मुव्हीज नावाचा सेक्शन आत्ताच माझ्या पाहण्यात आला. म्हणजे यु ट्युबवर टि.व्ही. शोज दाखवले जात आहेत हे मला माहित होतं… पण मुव्हिज देखील ऑफिशिअली (बहूतेक तरी!) दाखवले जात आहेत, हे मला माहित नव्हतं. तसं बघायला गेलं तर फार काही आनंदून जायची गरज नाही! कारण तिथे जे इंग्रजी सिनेमे आहेत, ते बहुतेक करुन जुनेच आहेत… हांऽ पण विवाह आणि mp3 हे नवीन हिंदी पिक्चर्स मात्र मझ्या पाहण्यात आले. बाकी ज्यांना हिंदी, इंग्रजी जुने चित्रपट पहायला आवडतात, त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, त्यांच्यासाठी यु ट्युबने दिलेली ही एक पर्वणीच आहे, असं म्हणावं लागेल. कारण त्या तिथे सर्व कॅटिगिरीचे सिनेमे त्या त्या कॅटॅगिरी प्रमाणे उपलब्ध आहेत. आणि हे सर्व चित्रपट १०-१० मिनिटांच्या भागात नसून, संपूर्ण स्वरुपात उपलब्ध आहेत. त्यामुळे विनाव्यत्यय तुमचं मनोरंजन होणार आहे हे नक्की!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.