यु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने

स्त असा वायरलेस कि-बोर्ड आणि वायरलेस माऊस… संगणकाचा टेबल आता रिकामा रिकामा दिसत आहे. आज 2know.in पन्नास धावा फटकावून फिप्टी साजरी करत आहे. म्हणजेच आजचा हा लेख 2know.in चा पन्नासावा लेख आहे. या पन्नास धावा काढण्यासाठी 2know.in ने ६५ चेंडूंचा सामना केला. म्हणजेच ५० लेख प्रकाशीत होण्यासाठी 2know.in ला ६५ दिवस लागले. खरं तर एक महिना झाला या इथे रोज एक लेख प्रकाशीत होत आहे. त्याआधी आमचा प्लेअर पीचवर जरा जम बसवत होता, त्यामुळे धावांची गती संथ होती. मग सुरु झाली फटकेबाजी! पण आमचा प्लेअर चांगलाच अनुभवी आहे. म्हणूनच तो आता थोडा जपून संथ गतीने खेळाणार आहे. काय करणार!? एक्झाम आहे यारऽ आता एकाच वेळी आमच्या टिमला अनेक मॅचेस खेळाव्या लागणार आहेत.

लाईव्ह आय.पी.एल. सामने

मॅचेस चालू आहेत ना! आय.पी.एल. च्याही… तुम्ही जर क्रिकेटसाठी वेडे असाल, आणि घरात जर सगळ्यांत मिळून एकच टि.व्ही. असेल, अशावेळी निर्माण होणार्‍या बिकट वहिवाटेला यु ट्युबने धोपट मार्ग मिळवून दिला आहे. आणि म्हणूनच संसारामध्ये एकदुसर्‍याला समजवत उगाच भटकत फिरण्यापेक्षा, कोणाला टि.व्ही. वर सास-बहू, कार्टून पाहयचे असेल, तर पाहू द्या… आणि तुम्ही आपलं संगणकाच्या स्र्किनला डोळे चिटकवून यु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. (IPL) सामना पहात बसा. विशेष म्हणजे यु ट्युबवर सामना पहात असताना तुमच्यासाठी एकाच वेळी दोन कॅमेरे उपलब्ध असणार आहेत. ते पहा! माझ्या वेब ब्राउजरच्या दुसर्‍या टॅबमध्ये ‘चिअर गर्ल्स’ नाचत आहेत… यु ट्युब च्या रुपाने क्रिकेट पाहण्यासाठी तुमच्यासमोर एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.