रस्ता दाखवा, पत्ता सांगा

पल्याला संगणकावर पहायची गुगलची ‘गुगल मॅप्स्‌’ ही वेबसाईट माहित आहेच, पण आज आपण पहाणार आहोत ते गुगल मॅप्स्‌ वापरुन आपल्या मित्राला एखादा पत्ता कसा सांगायचा? किंवा एखादा रस्ता कसा दाखवायचा!?

आता कल्पना करा की, तुम्ही पुण्याचे आहात आणि तुमचा बाहेरगावचा मित्र पुण्याला येणार आहे. तो स्वतःसाठी काही चांगले कपडे खरेदी करुन लगेच आपल्या गावी परतणार आहे. सगळं काही चांगल्याप्रकारे व्यवस्थीत पार पडावं, म्हणून तो तुम्हाला त्याबाबत माहिती विचारतो. तेंव्हा तुम्ही त्याला स्वारगेटपासून जवळच असलेल्या ‘जय हिंद’ या दुकानाबाबत सुचवता. मग अशावेळी ‘गुगल मॅप्स’ वापरुन स्वारगेटहून ‘जय हिंद’ ला जायची दिशा त्याला कशी दाखवाल!? हे अगदी सोपं आहे…

१. Google Maps वर जा.
२. डाव्या बाजूला वर ‘Get Directions’ वर क्लिक करा.
३. आता A च्या समोर टाका swargate (swa करेपर्यंत खाली Swargate, Pune, Maharashtra असं आलेलं असेल, त्यावर क्लिक करा.)

गुगल मॅप्स

४. B च्या समोर Jai Hind टाका ( jai करेपर्यंत खाली Jai Hind Collections, Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra असं आलेलं असेल, त्यावर क्लिक करा.)
५. आता Get Directions वर क्लिक करा. ‘जय हिंद कलेक्शन’ ची बरीच दुकाने असल्याने डाव्या बाजूला Did You Mean या मथळ्याखाली सर्व ‘जय हिंद कलेक्शन’ च्या सर्व दुकानांची यादी येईल. त्यापॆकी  पहिल्यावर (Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra) क्लिक करा.
६. उजव्या बाजूला नकाशात A, B आणि निळा रंग यांच्या सहाय्याने ‘स्वारगेट’पासून ‘जय हिंद’ ला जाण्याची दिशा दाखवलेली असेल. आणि डाव्या बाजूला नकाशात दाखवलेल्या रस्त्यावरुन कारने जायला किती वेळ लागेल, ते सांगितलेले असेल.
७. आता उजव्या बाजूला वर… Send वर क्लिक करा आणि आपल्या मित्राला हा नकाशा, पत्ता मेलने पाठवून द्या.

मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा

अशाप्रकारे गुगल मॅप्स वापरुन तुम्ही आपल्या मित्राला एखाद्या ठिकाणचा पत्ता सांगू शकता, किंवा तुम्ही स्वतःच एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्त्याचा शोध घेऊ शकता.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.