वर्तमानपत्र वाचण्याचे अतिउत्कृष्ट सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलवर!

-याचदा आपण बाहेर गावी फिरायला गेलेले असतो अथवा घरापासून कुठेतरी दूर असतो, अशावेळी अचानकच कुणाकडूनतरी काहितरी ब्रेकिंग न्यूज कळते किंवा आपल्याला क्रिकेटचा स्कोअर पहायचा असतो.  आणि मग विश्वासार्ह माध्यमासाठी आपण आपल्या मोबाईलवर जि.पी.आर.एस. ओपन करतो… मग गुगल न्यूज…पण थांबा! त्याला किती वेळ लागतोय! आणि त्या तिथे तुम्ही मराठीत हवी असलेली बातमी पाहू शकताय? जसं की सकाळ, लोकसत्ता…यांच्या असतात…नाही ना!?

पण मग आता आपली ही अडचणही अगदी पूर्णपणे (म्हणजे नजर लागावी इतक्या परिपूर्णपणे) दूर झाली आहे. त्याचं कारण आहे एक सॉफ्टवेअर जे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वर्तमानपत्रे वाचण्याची सुविधा उपलब्ध करुन देतं. या ‘वेगवान’ सॉफ्टवेअरचा वापर करुन तुम्ही सकाळ, लोकसत्ता, दॆनिक जागरण, दॆनिक भास्कर, The New Indian Express, Indian Express, Deccan Herald, दिव्य भास्कर , संदेश, mangalam, नवज्योती आणि इतर न वाचता येणा-या वेटोळ्या भाषेतले सहा, अशी एकूण सुमारे सतरा वर्तमानपत्रे अगदी संपूर्ण स्वरुपात विनासायास वाचू शकता.

तुमचा मोबाईल मराठी फंट्स सपोर्ट करत नाही!? काही काळजी करु नका! फक्त हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. फंट्सची कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि तुम्ही आरामात पडल्यापडल्या मराठी वर्तमानपत्राचा आनंद लुटाल. क्रिकेटचा लाईव्ह स्कोअर पाहता येणं हेही या सॉफ्टवेअरचं एक सर्वोत्कृष्ट वॆशिष्ट्य म्हणावं लागेल. याशिवाय आपण न्यूज चॅनल्सवर खाली तळाला बातम्यांची पट्टी फिरताना पाहतो ना! तशीच ताज्या मराठी बातम्यांची पट्टी तुमच्या मोबाईलच्या मेन स्क्रिनवर तळाला फिरत राहते. पण या सॉफ्टवेअरचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मी तुम्हाला एअरसेलचा ९९रु चा मासिक जि.पी.आर.एस. प्लॅन सुचवेन! हा प्लॅन आणि NewsHunt (वर्तमानपत्रांचे) सॉफ्टवेअर तुमचे जीवन अधिक सहज सुलभ करणार आहेत…फक्त अट इतकीच आहे की, तुम्ही त्यासाठी तयार रहा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.