वाय-फाय राऊटरमधील फरक

जुन्या वाय-फाय राऊटरची रेंज कमी पडू लागली, तेंव्हा मी एक नवीन वाय-फाय राऊटर विकत घ्यायचे ठरवले. फारसा विचार न करता ज्या राऊटरला सर्वाधिक रेटिंग्ज आहेत, ते वाय-फाय राऊटर मी ऑनलाईन मागवले. अर्थात वाय-फाय राऊटर हे उत्तमच होते, पण मला ज्या प्रकारच्या राऊटरची गरज होती, ते हे नव्हते. मला मोडेमविरहीत वाय-फाय राऊटरची गरज होती, तर मी मोडेमसहीत वाय-फाय राऊटर विकत घेतले. त्यामुळे मला पुनः एकदा नव्याने हवे त्या प्रकारचे राऊटर मागवावे लागले.

दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनेट कनेक्शन करीता दोन वेगवेगळ्या प्रकारचे खास वाय-फाय राऊटर आहेत. जे लोक बीएसएनएलसारखी इंटरनेट ब्रॉडबँड सेवा वापरतात (ADSL Connection), मला वाटतं त्यांना लँडलाईनच्या वायरमधून इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येते, त्यांच्यासाठी मोडेमसहित वाय-फाय राऊटर! आणि जे लोक टाटा, टिकोना अशा इतर ब्रॉडबँड सेवा वापरतात त्यांना केबलच्या माध्यमातून इंटरनेट पुरवले जाते, तेंव्हा अशांसाठी मोडेम विरहीत वाय-फाय राऊटर!

मी स्वतः कधी बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा वापरलेली नाही. त्यामुळे वाय-फाय राऊटरमध्ये असा काही प्रकार असतो, याबाबत मी अनभिज्ञ होतो.  तेंव्हा वाय-फाय राऊटर विकत घेत असताना आपला घोळ होऊ नये म्हणून खास हा लेख लिहित आहे.

आपण वाय-फाय राऊटर घेण्याच्या विचारात असाल, तर मी आपणास D-Link कंपनीचे वाय-फाय राऊटर घेण्याबाबत सुचवेन. जे लोक बीएसएनएलसारखे ADSL कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DSL-2750U Wireless N 300 ADSL2+ 4-Port Wi-Fi Router with Modem (Black) चा विचार करावा; आणि जे केबल कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DIR-605L Wireless N Cloud Router (Black) बाबत माहिती घ्यावी.

वाय-फाय राऊटर
डी-लिंक वाय-फाय राऊटर

वाय-फायची रेंज ही अनेक घटकांवर अवलंबून असते, तेंव्हा एखाद्या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही विशिष्ट मिटरमध्ये सांगणे कठिण आहे. पण वाय-फाय सिग्नल साधारणपणे किती अंतरापर्यंत काम करेल? हे अंदाजे सांगणे शक्य आहे. वर सांगितलेल्या ‘डी-लिंक’च्या वाय-फाय राऊटरला दोन अँटेने असून या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही साधारण १५ मिटरपर्यंत (कमी-जास्त अवलंबून) आहे. मला वाटतं हे डिव्हाईस मधल्या खोलीत ठेवल्यास एका घरासाठी ही रेंज पुरेशी आहे.

या लेखाच्या निमित्ताने मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःला मोबाईल व मोबाईल इंटरनेट पर्यंतच मर्यादीत ठेवू नका. इंटरनेटचा खर्‍या अर्थाने उपयोग करुन घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर आपल्या घरी अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट व वाय-फाय असणे अत्यंत आवश्यक आहे.

 • Machhindra Mali

  Rohanji good noon
  I am not using broadband connection but using bsnl internet through multiple sim modem.please advice me which router can I use for Wi-Fi ?
  Machhindra Mali Padegaon Aurangabad.

  • Multiple SIM Modem म्हणजे बहुतेक आपण BSNL चे सिमकार्ड ‘डेटा कार्ड’मध्ये घालून आपल्या संगणकावर इंटरनेट वापरत आहात. मला वाटतं कदाचित आपल्याला याची गरज आहे – http://amzn.to/1JA55a6.

 • Rajendra Naik

  माझ्या जवळ iBall 21.0 MP-58 Wi-Fi ready Airway Data Card (White) आहे. मी त्यात reliance GSM चे सिम लावले आहे. मला एक विचारायचे आहे की कुठले सिम 3जी साठी स्वस्त आणि मस्त आहे? कुठला plan चांगला आहे ?

  • माझ्या माहिती प्रमाणे टाटा डोकोमोचे ३जी स्वस्त आहे. तेंव्हा आपल्या इथे टाटा डोकोमो ३जी करीता चांगली रेंज असल्यास टाटा डोकोमोचे ३जी वापरण्यास हरकत नाही.

 • Pankaj Mahajan

  Which D-Link router Model is most suitable for compatibility with Idea 3G Netsetter Data modem suitable to 3 BHK flat area about 1200 sqft?