विकिमॅपिया वापरुन उपग्रहाची चित्रे आणि नकाशे पहा

गदी सुरुवातीला काही वर्षांपूर्वी मला खरं तर ‘गुगल अर्थ’बाबत काहीही माहित नव्हतं. मला माहित होतं ते विकिमॅपिया बाबत. विकिमॅपिया हे ऍप्लिकेशन अगदी ‘गुगल अर्थ’ सारखंच आहे, यात फरक फक्त इतकाच आहे की, ‘गुगल अर्थ’चा वापर करण्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घेतो, पण  विकिमॅपियाच्या बाबतीत काहीही डाऊनलोड आणि इंस्टॉल करण्याची गरज भासत नाही. आपल्या पृथ्वीची उपग्रहाच्या सहाय्याने घेतलेली छायाचित्रे तुम्ही आपल्या संगणकावर ऑनलाईन पाहू शकता.

बाकी विकिमॅपियामध्ये समाविष्ट असलेले ऑप्शन्स्‌ सांगत बसणं हे एक यांत्रिकी काम होईल. त्यामुळे मी तसं काही करणार नाही. त्यापेक्षा तुम्हाला लगेच त्याची लिंक देतो, म्हणजे तुम्ही स्वतःच त्यातिथे जाऊन सारं काही आपल्या डोळ्याने पाहू शकाल. विकिमॅपियावर जाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

तुम्हाला जर सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचा कंटाळा येत असेल, तर ‘गुगल अर्थ’च्या पॅरलल, पण ऑनलाईन उपलब्ध असलेली विकिमॅपियाची सेवा ही उपयुक्त ठरेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.