व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन कशी बदलावी?

‘व्हिएलसी मिडिआ प्लेअर’ हा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय असा मिडिआ प्लेअर आहे. ‘विंडोज मिडिआ प्लेअर’च्या माध्यमातून ठरावीक प्रकारच्या फॉरमॅटमधील फाईलच चालवल्या जाऊ शकतात. व्हिएलसीचा उपयोग मात्र जवळपास सर्व प्रकारच्या फाईल्स चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. पण या मिडिआ प्लेअरचा वापर शक्यतो व्हिडिओ पाहण्यासाठीच केला जातो. आणि तो त्याच अनुशंगाने असा बनलेला आहे. व्हिएलसी मिडिआ प्लेअरची ‘स्किन’ कशी बदलायची? ते आपण आता पाहणार आहोत.

एख्याद्या मिडिआ प्लेअरची डिझाईन, रचना, रंग, स्वरुप, यालाच आपण एकंदरीत त्या मिडिआ प्लेअरची ‘स्किन’ असं म्हणू शकतो. व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन बदलण्यासंदर्भातील पर्याय आपल्याला Preferences मध्ये दिसून येईल. Cltr+P दाबल्यावरदेखील Preferences ची खिडकी उघडली जाईल. यात Interface Settings मध्ये Look and feel संदर्भातील काही पर्याय आहेत.

व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन बदलणे: कस्टम स्किन

Look and feel मधून Use custom skin ची निवड करा. इथे Skin resource file समोर आपल्या संगणकावरील एका व्हिएलसी स्किनचा मार्ग (Path) आधिपासूनच दिला असल्याचे आपल्याला दिसून येईल. या स्किनचे नाव आहे default.vlt. Save वर क्लिक करुन व्हिएलसी मिडिआ प्लेअर बंद करा. त्यानंतर तो पुन्हा एकदा सुरु करा. आपल्याला व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन बदलल्याचे दिसून येईल.
आता पुन्हा एकदा Preferences मध्ये जाऊन Use custom skin निवडा. तिथे VLC skins website ची लिंक आहे. या पानावर आपल्याला अनेक व्हिएलसी मिडिआ प्लेअर स्किन्स दिसतील. यातील आपल्या आवडीची स्किन निवडा, माऊसने स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली डाऊनलोड लिंक दिसेल, ती लिंक वापरुन आपण निवडलेली स्किन संगणकावर डाऊनलोड करुन घ्या. आपण डाऊनलोड केलेली स्किन फाईल व्हिएलसी इन्स्टॉलेशन डिरेक्टरीमधील स्किन फोल्डरमध्ये, म्हणजेच C:Program FilesVideoLANVLCskins या ठिकाणी हलवा. आपण जर लिनक्स ही ऑपरेटिंक सिस्टिम वापरत असाल तर डाऊनलोड केलेली स्किन या इथे हलवा ~/.local/share/vlc/skins2. VLC skins website या पानावर सर्व व्हिएलसी स्किन्स एकत्र डाऊनलोड करण्यासाठी देखील एक लिंक देण्यात आली आहे
व्हिएलसी मिडिआ प्लेअरची एक स्किन
परत आपल्या व्हिएलसी मिडिआ प्लेअरच्या Preferences मध्ये जाऊन Use custom skin निवडा. व्हिएलसीला आपण डाऊनलोड केलेली आपल्या आवडीची स्किन देण्यासाठी आपल्याला त्या स्किनचा मार्ग (Path) द्यावा लागेल. त्यासाठी Choose… वर क्लिक करा आणि आपल्या आवडत्या व्हिएलसी स्किनचा मार्ग दर्शवा. बदल Save करा, व्हिएलसी मिडिआ प्लेअर बंद करुन चालू करा. आपल्याला व्हिएलसी मिडिआ प्लेअर आपल्या आवडत्या स्किन मध्ये दिसून येईल.

व्हिएलसी मिडिआ प्लेअर स्किन एडिटर

व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन स्वतः तयार करुन पाहण्याचा प्रयत्न देखील आपण करुन पाहू शकाल. त्यासाठी आपल्याला VLC media player skin editor ची मदत घ्यावी लागेल. अशाप्रकारे स्किन तयार करण्यासाठी कोडिंगचे कोणतेही ज्ञान असण्याची गरज नाही. व्हिएलसी मिडिआ प्लेअर स्किन एडिटरच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने स्किन तयार करु शकतो. व्हिएलसी मिडिआ प्लेअरची स्किन तयार करण्यासंदर्भातील संपूर्ण माहिती या पानावर देण्यात आली आहे – आपली स्वतःची व्हिएलसी स्किन कशी तयार कराल? (हे पान इंग्रजीत आहे).
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.