व्हिडिओ MP3 मध्ये बदला

व्हिडिओ mp3 मध्ये बदला

दोन-तीन दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की, एखादा व्हिडिओ रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा? आणि आज आपण पाहणार आहोत, एखादा व्हिडिओ mp3 च्या स्वरुपात कसा बदलता येईल? बर्‍याचदा… म्हणजे समजा एखादं गाणं असेल, किंवा मुलाखत असेल, असा कोणताही व्हिडिओ, की ज्याचा आवाज हा प्रत्यक्ष व्हिडिओपेक्षाही महत्त्वाचा आहे… अशावेळी …किंवा समजा तुम्हाला तुमच्या मोबाईलची मेमरी वाचवायची आहे, अशावेळीदेखील व्हिडिओपेक्षा mp3 चा पर्याय आवश्यक ठरतो. vidtomp3 या वेबसाईटचा उपयोग करुन एखादा व्हिडिओ mp3 मध्ये कसा बदलता येईल? ते मी खाली सांगत आहे…

१. youtube.com वरुन एखाद्या व्हिडिओचे यु.आर.एल. (url) कॉपी करा.
२. आता vidtomp3.com या वेबसाईटवर जा.
३. यु-ट्युब वरुन कॉपी केलेले url दिलेल्या जागेत पेस्ट करा.
४. डाऊनलोड (Download) वर क्लिक करा. थोडा वेळ वाट पहा.
५. दिलेला व्हिडिओ mp3 मध्ये पूर्णपणे कन्व्हर्ट झाल्यानंतर ‘Download MP3’ असा पर्याय दिसून येईल.
६. त्यावर क्लिक करा आणि mp3 डाऊनलोड करुन घ्या.

एखाद्या व्हिडिओचे रुपांतर mp3 मध्ये करता येणं हे खुपच गरजेचं आहे. आणि पुढे-मागे कधीही अशी गरज तुम्हाला भासू शकते. तेंव्हा वर दिलेली वेबसाईट लक्षात ठेवा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.