संगणकावरुन संगणकावर मोफत कॉल

ज आपण पाहणार आहोत, संगणकावरुन संगणकावर मोफत कॉल कसा करायचा!? अशा मोफत कॉलची सेवा पुरविणारे आजच्या घडीला अनेक आहेत, पण आपल्या इथे ऑर्कुट, जीमेलचे सभासद अधिक असल्याने आपण पाहणार आहोत, जी टॉक वापरुन संगणकावरुन संगणकावर मोफत कॉल कसा करायचा? सारं काही खूप सोपं आहे आणि तुम्ही लगेच तुमच्या मित्राशी कितीही वेळ मोफत बोलू शकाल. त्यासाठी जी टॉक आपल्याला मदत करणार आहे.

१. तुमच्या संगणाकावर आधिपासूनच जीटॉक इन्स्टॉल असेल, तर फारच चांगलं! नाहीतर या इथून जीटॉक आपल्या संगणकावर घ्या.
२. आता तुमच्या संगणकावर जीटॉक आहे! तो उघडा आणि आपले जीमेलचे युजरनेम आणि पासवर्ड देऊन आत प्रवेश करा.

मोफत कॉल

३. ज्याला कॉल करायचा असेल तो मित्र जर आधिपासूनच जीटॉकच्या यादीत असेल तर फारच छान! नाहीतर जीटॉकच्या खालच्या बाजूला Add असं लिहिलं आहे, त्यावर क्लिक करा. तुमच्या मित्राचा ई मेल ऍड्रेस टाका आणि Next वर क्लिक करा.
४. तुमच्या मित्राला Add होण्यासाठी तुम्ही केलेली request / विनंती, तुमच्या मित्राने स्वीकारल्यानंतर तुमचा मित्र तुमच्या जीटॉकच्या यादीत समाविष्ट झालेला असेल.
५. आपल्याला संगणकावरुन बोलता यावं यासाठी संगणकाला व्यवस्थित हेडफोन जोडला आहे का!? याची खात्री करुन घ्या.
६. आत्तापर्यंत तुम्ही ज्या पायर्‍या पूर्ण करत आलेले आहात, त्या सर्व पायर्‍या तुमच्या मित्रानेही पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
७. झालं तर मग! आता तुम्ही आणि तुमचा मित्र ज्यावेळी ऑनलाईन असाल, त्यावेळी संगणकावरुन संगणकावर ऎकमेकांशी कितीही वेळ मोफत बोलू शकाल.
८. त्यासाठी फक्त जीटॉकच्या यादीत असलेल्या तुमच्या मित्राच्या नावावर आपल्या माऊसचा कर्सर आणा आणि call वर क्लिक करा. तुमचा कॉल येत असल्याची सुचना, तिकडे तुमच्या मित्राला प्राप्त होईल, तो जेंव्हा कॉल स्विकारेल, तेंव्हा तुमचं संभाषण सुरु होईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.