सब्स्क्राईब म्हणजे काय?

वीन नवीन इंटरनेट वापरायला सुरुवात केली आणि ज्या वेबसाईटवर जाईन तिकडे ‘सब्स्क्राईब’ हा पर्याय दिसू लागला. प्रथम मला समजलंच नाही की हा काय प्रकार आहे ते… पण नंतर हळूहळू सारं काही लक्षात आलं. ठिक आहे… तर आता आपण आपली थोडीशी कल्पनाशक्ती वापरुयात. टि.व्ही. वरचा एखादा कार्यक्रम आवडला की दुस-या दिवशी त्याच ठिकाणी त्याच पोझिशनमध्ये बसून त्याच कार्यक्रमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी आपण अतुर असतो. असंच मग तिस-या दिवशी घडतं… चौथ्या दिवशी… जोपर्यंत तो कार्यक्रम तयार करणा-यांचा किंवा तुमचा स्टॅमिना संपत नाही तोपर्यंत… थोडक्यात काय!? तर एखादा कार्यक्रम आपल्याला आवडला तर आपण १.त्याची आणि २.त्याच्या पुढील भागांची ‘नोंद’ घेतो. अशाचप्रकारे जर एखादा ब्लॉग, वेबसाईट आणि त्यावरील लेख तुम्हाला आवडला, तर तुम्ही काय कराल? ती वेबसाईट आपल्या ‘वेब ब्राऊजर’ मध्ये बुकमार्क कराल. पण हे झालं १.त्या वेबसाईटची नोंद घेणं. त्या वेबसाईटवर, ब्लॉगवर ‘भविष्यकाळात प्रकाशीत होणा-या’ लेखांची नोंद घ्यायची असेल तर? …त्या वेबसाईटवर ‘नवीन काही आलं आहे का?’ हे पाहण्यासाठी वारंवार त्या वेबसाईटला भेट द्याल…!? पण मग ते तर फारच गैरसोयीचं ठरेल.  २.म्हणूनच आवडलेल्या वेबसाईट, ब्लॉगवरील पुढील लेखांची, बदलांची (व्हिडिओ, फोटो इ.) ‘नोंद’ घेण्याकरीता आपण ‘सब्स्क्राईब’ हा पर्याय वापरतो.

‘सब्स्क्राईब ’ या पर्यायाद्वारे नोंद घेण्याचेही अनेक प्रकार आहेत. तुम्हाला जो प्रकार सोयीचा वाटतो तो तुम्ही निवडायचा असतो. जसं माझ्या या वेबसाईटवरच पहा. या लेखाच्या शिर्षकाखाली ‘subscribe’ असं लिहिलेलं एक बटण आहे. त्यावर क्लिक केलं की एक नवीन टॅब ओपन होतो. या नव्याने उघडलेल्या पानावर my yahoo, google, my aol, bloglines, technorati, netvibes, my msn इ.इ. अनेक पर्याय आहेत. आपण यांना एकसारखीच सेवा पुरवणा-या वेगवेगळ्या कंपन्या समजुयात. जसं समजा… एअरटेल, आयडिआ, व्होडाफोन, रिलायन्स या एकसारखीच सेवा पुरवणा-या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पण शेवटी ते काम ( मोबाईलद्वारे संपर्क) एकाच प्रकारचे करतात. ‘मोबाईलद्वारे संपर्क’ ही या सा-या कंपन्यांची मुख्य सेवा असली, तरीही लोकांपर्यंत ते ही सेवा कशाप्रकारे पोहचवतात ते महत्त्वाचं आहे. तसंच my yahoo, google reader, my aol, my msn, bloglines या सा-यांचं आहे. सर्वांना पडताळून पाहिल्यानंतर यापॆकी कोणची सेवा तुम्हाला आवडते, ते तुम्ही स्वतःच ठरवणार आहात. पण शेवटी बेसिकली ‘नवीन लेखांची नोंद घेणे’ हेच काम ते सारे करतात किंवा करत असतात.
‘सब्स्क्राईब’, RSS Feed चे चिन्ह
नवीन लेखांची, बदलांची नोंद घेण्याचा आणखी एक लोकप्रिय पर्याय म्हणजे ‘ई-मेल सब्स्क्रिप्शन’. एखाद्या बेबसाईट, ब्लॉग लेखाकाने जर त्याच्य़ा ब्लॉगवर नवीन लेख टाकला की त्याची माहिती तुम्हाला लगेचच तुमच्या ई-मेलवर प्राप्त होते. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आवडलेल्या वेबसाईटर, तुमचा ई-मेल आय.डी. देऊन ठेवावा लागतो. जसं या लेखाच्या शिर्षकाखाली एक फॉर्म आहे. जवळपास तशाचप्रकारचा फॉर्म तुम्हाला इतर वेबसाईटवरदेखील आढळून येईल. (जर त्या वेबसाईट मालकाने तो उपलब्ध करुन दिला असेल तर). दिलेल्या रिकाम्या जागेत तुम्ही तुमचा मेल आय.डी. टाकला, सब्स्क्राईबवर क्लिक केले, एकदा आपल्या मेल आकाऊंटचे व्हेरिफीकेशन केले, की झालं! तुम्हाला नवीन लेखांची नोंद तुमच्या ई-मेल आकाऊंट मध्ये मिळायला सुरुवात होते. एखाद्या बेबसाईटवरचा नवा लेख तुम्हाला तुमच्या ई-मेल अकाऊंटवर मेलच्या रुपाने संपूर्ण स्वरुपातही प्राप्त होऊ शकतो. (पण ते त्या त्या वेबसाईट मालकाच्या मनावर अवलंबून आहे).
तर ही झाली सब्स्क्राईब म्हणजे काय? याची थोडक्यात माहिती. मला माहित आहे की ही परिपूर्ण नाहिये… अजूनही बरंच काही सांगण्यासारखं आहे… मी सांगेनही… पण तोपर्यंत तुम्हाला काही अडचण असेल तर खाली आपला कॉमेंट बॉक्स आहेच.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.