स्क्रिन नेम आणि युजरनेम तयार करा

रं तर स्क्रिन नेम आणि युजरनेम मध्ये थोडासा फरक आहे, पण त्यांच्यात जवळपास साधर्म्य असल्याने, त्यांना एकच गृहीत धरुन मी आजचा हा लेख लिहित आहे. तर आज आपण स्क्रिन नेम जनरेटरची माहिती घेणार आहोत, जो आपल्याला एक चांगला स्क्रिन नेम, युजर नेम, टोपण नाव मिळवून देईल. एखादी वेबसाईट आवडली आणि तिथे ‘साईन अप’ हे ऑप्शन दिसलं की, आपण लगेच त्यावर क्लिक करतो आणि मग आपल्यासमोर उघडतो तो ‘साईन अप फॉर्म’!. त्या फॉर्ममध्ये अगदी सुरुवातीलाच एखादं युजर नेम निवडण्यास सांगितलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय? तर आपल्याला आपल्यासाठी एक टोपण नावच निवडायचं असतं. आणि मग ते काहीही असू शकतं… मनोगतवर मराठी लोकांनी निवडलेली काही टोपण नावं फारच मजेशर असतात… असो… टोपण नाव निवडायची वेळ येते, तेंव्हा ते आधीच ठरवलेलं नसेल, तर स्वतःचं डोकं खाऊन घ्यायची देखील तीच वेळ असते.

अशावेळी कोणाची तरी मदत मिळाली तर फारच छान होईल! म्हणजे डोकं खायला नाही, तर या प्रश्नावर समाधानकारक उत्तर द्यायला! आणि असं उत्तर देणारी पहिली वेबसाईट आहे,

१. spinxo.com :
या वेबसाईटचा उपयोग करुन तुम्हाला तुमच्यासाठी एखादं चांगलंसं स्क्रिन नेम निवडता येईल. म्हणजे त्या वेबसाईटवर दिलेल्या रकान्यात तुमची आवड, टोपण नाव, छंद, नंबर इ. विषयी तुम्हाला वाटेल ती माहिती भरायची आणि त्यासमोरच दिलेल्या SPIN! या बटणावर क्लिक करायचं! की झालं! तुमच्यासाठी स्क्रिननेमची एक भलीमोठी यादी खाली तयार होईल.

२. generatorland.com :
इथेही युम्ही तुमच्यासाठी एखादे स्क्रिननेम जनरेट करु शकता. वर दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर फक्त ‘Get Screen Name’ वर क्लिक करायचं , आणि तुमच्यासाठी  एक टोपण नाव तयार असेल!

अवतार

३.online-generator.com :
ही आणखी एक वेबसाईट आहे जी तुम्हाला याकामात मदत करु शकेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर Fantasy names, Business Names, Nicknames या पर्यायांखाली दिलेल्या अगदी कोणत्याही उपपर्यायावर क्लिक करा आणि तुमच्यासाठी तुमचं वेगळं नाव तयार असेल.

४. myusernamegenerator.com :
ही वेबसाईट मात्र खास युजरनेम जनरेटर आहे. Generate वर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासाठी एक युजरनेम तयार होईल. तसं करत असताना तुम्ही bad names, fantasy names, Insult names, nerdy names यांपॆकी एका हव्या त्या प्रकाराची निवड करु शकता.

५. username-generator.com :
ही आणखी एक वेबसाईट आहे, जी तुम्हाला युजरनेम बनवण्यात मदत करेल. तिथे युजरनेम्सची एक भलीमोठी यादी दिलेली आहे, त्यापॆकी एकाची निवड तुम्ही आपल्यासाठी करु शकता.

तर अशाप्रकारे आज आपण स्क्रिन नेम, युजरनेम जनरेटर्स विषयी माहिती घेतली आहे, जे आपल्याला मदत करु शकतील, जेंव्हा वेळ येईल, युजरनेम निवडण्यासाठी आपलं डोकं खाऊन घेण्याची!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.