स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत

आज मी स्मार्टफोनवर ‘मराठी टाईप करण्याची’ नव्हे, तर प्रत्यक्ष ‘मराठी लिहिण्याची’ ‘प्रचंड’ सोपी पद्धत सांगणार आहे! स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या प्रगतीतला एक मोठा अडसर दूर झाला आहे. परिणामी  यापुढील काळात इंटरनेटवरील मराठी भाषेचा वावर हा  निश्चितपणे वाढणार आहे! आणि मराठी भाषेच्या विकासासाठी ही एक खूप ‘सकारात्मक’ गोष्ट आहे.

सहजतेने करता येऊ शकतील अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टींकडे गूगलचे अनेकदा दूर्लक्ष होते. पण इंटरनेट क्षेत्रातील गूगलचं योगदान मात्र निश्चितपणे अनन्यसाधारण असंच आहे! त्यामुळेच या लेखाची सुरवात करण्यापूर्वी मी गूगलचे मनःपूर्वक आभार मानतो! कारण आज स्मार्टफोनवरुन इतक्या सहजतेने मराठी लिहिणं हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे.

स्मार्टफोनवर मराठी कसे लिहाल?

स्मार्टफोनवर मराठी लिहिण्यासाठी आपणास गूगल प्ले स्टोअर मधून गूगलचे एक नवे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. Google Handwriting Input (गूगल हँडरायटिंग इनपुट) असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप आत्तापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड केले असून जवळपास ३० हजार लोकांनी मिळून या अ‍ॅपला ५ पैकी ४.४ गुण दिले आहेत. आपल्याला या अ‍ॅपसाठी साधारण ५० एमबी इन्टरनल मेमरीची आवश्यकता भासेल.

Google Handwriting Input या अ‍ॅपबद्दल सर्वसाधारणपणे असे सांगता येईल की, हा एक कोणतीही ‘की’ नसलेला ‘कीबोर्ड’ आहे. हे अ‍ॅप एखाद्या कोर्‍या पाटीसारखे आहे, ज्यावर आपण बोटाने रेघोट्या ओढू शकतो, अक्षरे काढू शकतो. आणि सर्वांत विशेष म्हणजे हे अ‍ॅप चक्क आपले मराठी हस्ताक्षरही ओळखू शकते! Google Handwriting Input या अ‍ॅपला ‘कीबोर्ड’ म्हणनं हे तसं योग्य होणार नाही, पण या लेखात आपण आपल्या सोयीसाठी यास ‘कीबोर्ड’ असंच म्हणूयात.

Google Handwriting Input हे अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर थेट आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये या. इथे Personal या विभागात Language & input नावाचा पर्याय असेल, त्यावर स्पर्श करा. आता KEYBOARD & INPUT METHODS विभागात आपल्याला Google Hangwriting Input नावाचा पर्याय दिसेल, तो पर्याय निवडा.

स्मार्टफोनवर मराठी
Google Handwriting Input ची निवड करुन सेटिंग्जमध्ये या

आपल्याला खाजगी माहितीच्या सुरेक्षेसंदर्भात (उदा. पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, इ.)  एक सुचना येईल. प्रत्येक नव्या कीबोर्डच्या वापरापूर्वी येणारी ही एक नेहमीची सुचना आहे. आपण प्रत्यक्ष गूगलचा कीबोर्ड वापरत असल्याने गूगलवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. त्यामुळे OK वर स्पर्श करा.

आता आपल्याला या कीबोर्डचे पर्याय पहायचे आहेत. त्यामुळे या कीबोर्डच्या नावासमोरील सेटिंग्जच्या चिन्हावर स्पर्श करा. त्यानंतर Input Languages नावाच्या पहिल्या पर्यायावर स्पर्श करा. इथे Use system language नावाचा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, ती निवड रद्द करा. त्यानंतर खाली ACTIVE INPUT METHODS मध्ये आपल्या Marathi भाषेचा शोध घ्या आणि मराठी भाषेची निवड करा. वर English चा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, तो तसाच ठेवा! कारण लिहित असताना आपणास मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांची गरज पडू शकते.

मराठी कीबोर्ड पर्याय
Google Handwriting Input संदर्भातील पर्याय

या कीबोर्डच्या सेटिंग्जमध्ये Theme नावाचा देखील एक पर्याय आहे. त्यानुसार आपण आपला कीबोर्ड हा पांढर्‍या अथवा काळ्या रंगात वापरु शकतो. मला स्वतःला काळा कीबोर्ड आवडतो, तेंव्हा मी Theme मधून Material Dark या पर्यायाची निवड केली आहे. Auto Selection ४००ms. असेल. बाकी गोपनियतेची चिंता असल्यास Share usage statistics हा पर्याय OFF करता येईल.

आता प्रत्यक्ष आपला कीबोर्ड वापरण्याची वेळ आली आहे. वेब ब्राऊजर, नोटपॅड असे कोणतेही एखादे साधन निवडा ज्यावर आपणास मराठी लेखनाची चाचणी करता येईल. स्पष्टीकरणार्थ आपण ‘वेब ब्राऊजर’ उघडला आहे, असे मी गृहित धरतो. आता आपण जर वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये स्पर्श केला, तर आपला पूर्वीचाच कीबोर्ड अवतरेल. तेंव्हा आपणास ‘नोटिफिकेशन’ विभागातून Google Handwriting Input हा नवा कीबोर्ड निवडावा लागेल.

एखादा मेसेज आल्यानंतर आपण ज्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढतो, त्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढा. इथे आपणास Choose input method नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यात Marathi – Google Handwriting Input असा पर्याय असेल, तो पर्याय निवडा.

आपल्याला अशी सुचना मिळेल की, या भाषेसाठी ४.७ एमबी इतका डेटा डाऊनलोड करावा लागेल. OK वर स्पर्श करा. त्यानंतर आपल्याला गूगलच्या अटी स्विकारण्यासंदर्भात विचारले जाईल. हवं तर त्या अटी वाचून घ्या आणि OK वर स्पर्श करा.  एव्हाना कदाचित ४.७ एमबी डेटा डाऊनलोड झाला असेल. हा डेटा डाऊनलोड झाल्यानंतर आपण ‘स्मार्टफोनवर मराठी लिहिण्यास’ सुरुवात करु शकाल

पहिला शब्द काय लिहिल? आपल्या हस्ताक्षरात ‘मराठी’ असंच लिहून पहा! याकरीता आपलं हस्ताक्षर फार चांगलं असण्याची आवश्यकता नाही. गूगलची स्मार्ट प्रणाली आपलं खराब हस्ताक्षर ओळखण्यास सक्षम आहे. मराठी अक्षरे लिहिताना वरची रेघ ओढण्याची गरज नाही. ते काम या अ‍ॅपद्वारे आपोआप केले जाईल.

मराठी लिहिता लिहिता जर एखादा इंग्लिश शब्द लिहायचा असेल, तर त्या कीबोर्डवर खाली डाव्या बाजूस एक गोलाकार चिन्ह दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यानंतर आपणास याच कीबोर्डच्या माध्यमातून इंग्लिश भाषेतून लिहिता येईल. पुन्हा त्याच चिन्हावर स्पर्श केला असता, परत पहिल्याप्रमाणे मराठीतून लिहिता येईल. # @ अशी चिन्हे अथवा :-) 😀 अशा स्माईलीजचा वापर करायचा झाल्यास इंग्लिश कीबोर्डचा वापर करा.

स्मार्टफोनवर मराठी
स्मार्टफोनवर ‘मराठी’ लिहा

अर्थात कोणतीही नवी गोष्ट शिकण्याकरीता थोड्याफार सरावाची आवश्यकता ही असतेच! तेंव्हा आता यापुढे आपण दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर कराल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही! स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची ही पद्धत आपल्या सर्व मित्रांना तर सांगाच! पण जास्तितजास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवा!

  • निशांत

    कॄपया ऑनलाइन अभ्यासासाठी ,स्पर्धा परिक्षेसाठी चांगल्या साइट्स सागाव्यात..

    • http://2know.in/ Rohan

      स्पर्धा परिक्षांच्या आभ्यासाकरीता काही चांगली मराठी संकेतस्थळे सापडल्यास भविष्यात मी त्यासंदर्भात लेख लिहिन.

  • Prashant Borate

    mala vatte Google Hindi Input haa hi changla paryaay aahe.
    Android Phones saathi link play store link share karat aahe – https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi

    • http://2know.in/ Rohan

      अनेकजण मराठीसाठी Google Hindi Input वापरण्याबाबत सुचवतात! पण प्रत्यक्ष मराठीचा ‘राजमार्ग’ उपलब्ध असताना हिंदीचा ‘आडमार्ग’ वापरण्याची काही आवश्यकता नाही. यात दोन प्रमुख मुद्दे आहेत, १. मराठीमध्ये सर्रास वापरल्या जाणार्‍या ‘ळ’ या अक्षराचे काय? आणि २. मराठी टाईप करण्यापेक्षा मराठी लिहिणं हे प्रचंड सोयीचं असून वेळ व त्रास वाचवणारं आहे.

      • Prashant Borate

        Rohan,
        mudda aahe yaat.
        jase tu Malarthi ळ ya akshara baddal bolalalas tasa ज्ञ ya kshara baddal hi aahe. Pan he askhar aslele shabd sarras yet naahit.

        Aso mi fkt paryaay suchavla. Please dont mind.

        • http://2know.in/ Rohan

          मित्रा हे पहा! ‘सकाळ’, ‘संध्याकाळ’, ‘भूतकाळ’, ‘भविष्यकाळ’, ‘वेळ’, ‘फळ’, ‘कशामुळे’, ‘त्यामुळे’, इत्यादी. हे सर्रास वापरले जाणारे शब्द नाहीत तर काय?

          • Prashant Borate

            Rohan

            Ha video paha mi ataach upload kela aahe.

            Watch “गूगल हिंदी इनपुट ऍप (Google Hindi Input)” on YouTube – https://youtu.be/s-kPVne9KtE

          • http://2know.in/ Rohan

            मी स्वतः कधी Google Hindi Input वापरुन पाहिलेले नाही. तेंव्हा हिंदी कीबोर्डवर ‘ळ’ या अक्षराचा समावेश केलेला असेल, याबाबत मला खात्री नव्हती. पण आपण म्हणत आहात, त्याप्रमाणे या कीबोर्डच्या सहाय्याने ‘मराठी’ लेखनात यत्किंचितही समस्या येत नसेल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सरावामुळे लिहिण्यापेक्षा टाईप करणं सोपं जात असेल, तर हा कीबोर्ड वापरण्यासही हरकत नाही. शेवटी कोणत्याही माध्यमातून मराठीचा वापर वाढणं महत्त्वाचं आहे. बाकी आपण स्क्रिन रेकॉर्डिंगसाठी कोणत्या अ‍ॅपचा वापर केला आहे? आणि त्यासाठी रुट अ‍ॅक्सेस असणं गरजेचं आहे का?

          • Prashant Borate

            Screen Recorder he app aahe je mala Custom Rom madhe milte.

            Pan Play Store vr [https://play.google.com/store/apps/details?id=com.hecorat.screenrecorder.free] AZ Screen Recorder – No Root he Free app aahe. Vaparun paha.

          • http://2know.in/ Rohan

            धन्यवाद! मी हे अ‍ॅप वापरुन पाहतो.

          • Prashant Borate

            vaapraa aani jar kharach upyogi asen tr lekh jaroor lihaa. Karan tumcha blog ha mala vatte ekamev Tech Blog aahe jo marathitch asto.

          • http://2know.in/ Rohan

            हो नक्कीच! या अ‍ॅपची विस्तृत माहिती घेऊन नंतर मी त्यावर एक लेख लिहिन. हा ब्लॉग खास ‘मराठी’ लोकांसाठी आहे, तेंव्हा कितीही अडचणी आल्या, तरी या ब्लॉगवरील सर्व लेख हे कायम आपल्या ‘मराठी’ भाषेतच असतील. :-)

  • Machhindra Mali

    रोहनजी , आपण स्मार्ट फोनवर मराठी कसे लिहावे? या बाबत उपयुक्त आणि छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. यापुढेही आपण एक एका विषयांवर तपशीलवार सविस्तर माहिती देत रहा. म्हणजे माझ्या सारख्या नवोदितांला स्मार्टफोन व इंटरनेट वापरण्यास मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद.
    मच्छिंद्र माळी, पडेगांव औरंगाबाद.

    • http://2know.in/ Rohan

      मनःपूर्वक आभार! :-) मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करेन! आपल्या सर्वांचं प्रेम, प्रोत्साहन यातूनच मला कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते.

  • राजीव नाईक

    रोहनजी खुप छान म‍ाहिती दिली.

  • kiran

    sir how to lock internet, pls suggest