अँड्रॉईड फोनवर जस्टडायल अ‍ॅप्लिकेशन

स्ट डायल ही सुविधा आपणा सर्वांना कदाचीत माहित असेल. आपल्याला जर एखादी सेवा हवी असेल आणि ती कुठे मिळेल? हे आपणाला माहित नसेल, तर आपण जस्ट डायलच्या नंबरवर फोन करतो. त्यांना आपल्याला काय हवं ते सांगितल्यानंतर ते आपल्या डेडाबेसमध्ये त्याबाबत पाहणी करतात आणि आपल्याला हवी असलेली सेवा पुरविणार्‍याचा फोन नंबर, पत्ता ते आपल्याला सांगतात. यासाठी ते आपल्याकडून कोणताही मोबादला घेत नाहीत.
मग जस्टडायल मागे काम करणारे कमवतात कसे? ते काही इच्छुक सेवा पुरवठादारांकडून पैसे घेतात. आणि जेंव्हा लोक त्यांना (जस्टडायल) फोन करतात किंवा त्यांच्या साईटवर एखाद्या सेवेसंदर्भात शोध घेतात, तेंव्हा पैसे देणार्‍या सेवादात्यांची ते त्या लोकांना प्रामुख्याने शिफारस करतात. अशाप्रकारे जस्टडायलची थोडक्यात एकंदरीत कार्यप्रणाली आहे.
जस्टडायल ही एक फारच उपयुक्त सुविधा आहे. ती आपल्या स्वतःच्या फायद्याची आहे आणि मोफत आहे. शहरातील सर्व प्रकारचे सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांच्या मधला दुवा म्हणून जस्टडायल ही सुविधा काम करते. आपल्या शहरातील, आपल्या परिसरातील सेवा पुरविणार्‍यांची माहिती मिळविण्यास जस्ट डायल उपयुक्त आहे. 
जस्टडायल अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन
तर अशा या जस्टडायलची स्वतःची चांगली वेबसाईट आहे आणि अत्यंत चांगले असे अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन देखिल आहे. अँड्रॉईड मार्केट मध्ये जस्टडायल (JustDial) बाबत शोध घेऊन ते आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करुन घ्या. आत्तापर्यंत सुमारे २ लाख लोकांनी जस्टडायलचं अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाईलवर घेतलं आहे. ४.७ असं या अँप्लिकेशनचं अत्यंत चांगलं रेटिंग आहे. जस्टडायलची सुविधा थेट आपल्या मोबाईलवर आल्याने आता आपल्या शहरात एखाद्या सेवाचा शोध घेणं अधिक सोयिस्कर जाणार आहे. अँड्रॉईड मार्केटच्या वेबसाईटवर आपल्याला जस्टडायलच्या अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन बाबत अधिक माहिती मिळेल आणि स्क्रिनशॉट्स देखिल पाहायला मिळतील. लिंक – जस्टडायल अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.