अँड्रॉईड फोनवर डायरी

अँड्रॉईड फोनसाठी खरं तर अनेक दैनंदिनी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण मी आज त्या डायरीबद्दल बोलणार आहे, जी मी स्वतः माझ्या आठवणी लिहिण्यासाठी वापरतो. सध्या मी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसाबद्दल थोडक्यात माझ्या मोबाईलमधील रोजनिशीवर नोंद करुन ठेवतो. कागदाची एखादी डायरी वापरण्यापेक्षा मला मोबाईलमधील डायरीमध्ये लिहिणं हे अधिक सोयीचं वाटतं. कारण झोपताना मोबाईल जवळच असतो, तेंव्हा डायरी कपाटात संभाळण्याची गरज उरत नाही. शिवाय या दैनंदिनीला पासवर्डने प्रोटेक्ट करणं हे अधिक सोयीचं आहे. मला वाटतं मी यापूर्वी खूप आधी “लाईफ रीमार्कस्‌” या सिंबियन मोबाईलसाठी बनलेल्या डायरीबद्दल लेख लिहिला होता, आता कदाचीत तो लेख कालबाह्यदेखील ठरलेला असावा. पण आज मी ज्या रोजनिशीबद्दल सांगत आहे, ती “लाईफ रीमार्कस्‌” पेक्षा खूपच अधिक चांगली आहे.

जीवनतील विविध गोष्टी साकार करण्यासाठी आपल्याला माध्यमाची गरज असते. आपला अँड्रॉईड स्मार्टफोन आता अशा दमदार माध्यमाची जागा घेऊ लागला आहे. बँकिंगपासून फायनान्शिअल कॅलक्युलेटर पर्यंत, गेम्स पासून कॅमेरॅपर्यंत, स्पिडोमीटर, जमिनीची अचूक पातळी तपासने, इ. अनेक गोष्टी आज अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून सहज शक्य आहेत. आपल्या पारंपारीक रोजनिशीची जागही आता अँड्रॉईड फोनमधील डिजीटल डायरी घेऊ लागली आहे. पारंपारीक डायरीपेक्षा ही अधिक उपयुक्त, फायदेशीर, सुरक्षीत आहे. अशा अनेक डिजीटल डायरी अँड्रॉईड मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहेत आज आपण त्यापैकीच एका डिजीटल डायरीची माहिती घेणार आहोत. 
आपल्या आठवणी फोनमध्ये साठवून ठेवा

आज आपण ज्या रोजनिशीबाबत माहिती पाहणार आहोत, त्या रोजनिशीचं नाव आहे, Memories: The Diary. आपल्याला या रोजनिशीची लिंक 2know.in च्या डाऊनलोड साईटवर सापडेल. या डायरीची वैशिष्ट्ये काय आहेत? ती आता आपण पाहूयात.
मेमोरीज: द डायरी, रोजनिशी, दैनंदिनी
  1. ही डायरी आपल्याला पासवर्डने प्रोटेक्ट करता येते. 
  2. या डायरीचा आपण बॅकअप घेऊ शकतो.
  3. या डायरीमध्ये आपल्या आठवणीबरोबरच आपण ती आठवण लिहित असतानाची वेळ, जागा आणि हवामान यांची आपोआप नोंद होते.
  4. आपल्या फोनच्या मेमरी कार्डच्या क्षमतेनुसार आपण या डायरीमध्ये आपल्याला हवे तितके फोटो साठवून ठेवू शकतो.
  5. आपल्याला जर लिहायचा कंटाळा आला असेल, तर या डायरीमध्ये आपण आपला आवाज रेकॉर्ड करुन आपल्या आठवणीची नोंद ठेवू शकता.
  6. या डायरीचा अत्यंत सुलभ आणि सुंदर असा युजर इंटरफेस आहे.
  7. या डायरीमध्ये आपल्या भावना योग्य रीतीने व्यक्त होण्याकरीता Smileys आहेत. 
  8. टॅगच्या माध्यमातून आपण या डायरीमधील नोंदींचे वर्गीकरण करु शकतो.
  9. सर्चच्या माध्यमातून आपण या डायरीमधील नोंदीमध्ये शोध घेऊ शकतो.
  10. याव्यतिरीक्त या डायरीचे अनेक फिचर्स आहेत, जसं पिकासा वेब अल्बम मधून फोटो इंपोर्ट करणं, गुगल डॉक्युमेंट म्हणून नोंदी एक्सपोर्ट करणं, इत्यादी. 
आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डायरीचं हे अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन अगदी मोफत आहे. मला वाटतं अँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्वांना आजचा लेख आवडला असेल. आपणाला जर माझी साईट पसंत पडली असेल, तर माझी आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. 2know.in चे फेसबुक पेज ‘लाईक’ करा. आणि खाली तरंगणार्‍या बारवर गुगलचे +1 हे जे चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे आपल्या मित्रपरिवाराला 2know.in बाबत माहिती होण्यास मदत होईल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.