आता कोणतीही गोष्ट अधिक गतीने डाऊनलोड करा

जितकी गती अधिक, तितका अधिक इंटरनेट वापरण्याचा आनंद. कधीकधी आपल्याला खूप मोठ्या फाईल्स डाऊनलोड करायच्या असतात. जसं १५०MB, ७००MB इ. अशावेळी आपल्या इंटरनेट कनेक्शनची गती अधिक असणं हे तर आवश्यक आहेच, पण त्याचसोबत आवश्यकता आहे ती एका अशा सॉफ्टवेअरची, जे आपल्या फाईलचा डाऊनलोडिंग स्पीड अनेक पटींनी वाढवेल. आणि अशावेळी मला सुचवावंसं वाटतं ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ बाबत. म्हणजेच त्याला थोडक्यात DAP असं म्हणतात. DAP ची सध्या ९.४ क्रमांकाची आवृत्ती उपलब्ध आहे. ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ चा उपयोग करण्यासाठी खाली सांगतल्याप्रमाणे करा.

१. ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घ्या.
२. ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ ओपन करा.
३. आता तुम्हाला जी फाईल डाऊनलोड करायची आहे तिची लिंक कॉपी करा.
४. DAP मधील ‘ADD’ या बटणावर क्लिक करा.
५. कॉपी केलेली लिंक दिलेल्या रिकाम्या जागेत भरा.
६. OK या बटणावर क्लिक करा.
७. DAP मार्फत तुमचे डाऊनलोडिंग सुरु होईल.
८. पाच कनेक्शन्स्‌द्वारे तुमची फाईल आधिपेक्षा ३ ते ५ पट अधिक वेगाने डाऊनलोड होत असल्याचं तुम्हाला दिसून येईल.

एकाद्या लिंकवर उजवे क्लिक केल्यानंतरही तुमच्यासाठी ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’च्या सहाय्याने डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध होईल. अशाप्रकारे आता डाऊनलोडिंग होईपर्यंत तासंतास संगणकाच्या स्क्रिनकडे पहात बसण्याची गरज उरणार नाही. ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ सोबत तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. म्हणूनच आता कोणतीही मोठी फाईल डाऊनलोड करण्यासाठी ‘डाऊनलोड ऍक्सलरेटर प्लस’ चा उपयोग जरुर करा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.