आपला ब्लॉग फेसबुकशी जोडा

नोंद: हा लेख आता कालबाह्य झाला आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. याच विषयावर लवकरात लवकर एक नवीन लेख लिहायचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत 2know.in वरील इतर लेखांचा लाभ घ्यावा.

खाद्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी फेसबुक हे माझ्या दृष्टीने फारच दमदार माध्यम आहे. ऑर्कुटच्या जाहिराती देखील फेसबुकद्वारे करता येऊ शकणार्‍या प्रचारापुढे फिक्या आहेत. फेसबुकचा एक मुख्य फायदा म्हणजे फेसबुकवरील आपल्या मित्राने केलेला अपडेट असो अथवा आपण समाविष्ट आहोत अशा फेसबुक पेज मध्ये झालेला अपडेट असो! तो आपल्या मुख्य पानावार दिसतो. याउपर फेसबुक पेजमध्ये झालेल्या अपडेटवर आपण काही प्रतिक्रिया दिली, तर तो फेसबुक पेज अपडेट आपल्या सर्व मित्रांच्या मुख्य पानावर देखील दिसतो. अशाप्रकारे फेसबुकवर एखाद्या गोष्टीचा जबरदस्त प्रचार होत रहातो. फेसबुकवर प्रचाराचा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे आपला ब्लॉग फेसबुकला जोडायचा! आणि तोच आज आपण पाहणार आहोत.

ब्लॉग फेसबुकशी जोडा
फेसबुकला आपला ब्लॉग जोडणं फारच सोपं आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे, जेंव्हा जेंव्हा आपण आपल्या ब्लॉगवर एखादा नवीन लेख लिहाल, तो लेख ब्लॉगबरोबरच आपोआप आपल्या फेसबुक प्रोफाईलवरही प्रकाशीत होईल. आणि हा प्रकाशीत झालेला लेख (लिंकसह लेखाचा काही भाग या अर्थाने) फेसबुक अपडेट्सद्वारे आपल्या सर्व मित्रांच्या फेसबुकवरील मुख्य पानावर दिसेल. अशाप्रकारे आपला लेख आपल्या सर्व मित्रांपर्यंत अगदी सहजगत्या पोहचेल. …आणि आपल्या मित्राने आपल्या लेखावर प्रतिक्रिया दिली, तर मग तो आपल्या मित्राच्या मित्रांपर्यंत पोहचेल. आपल्या लेखाचा, ब्लॉगचा असा अगदी उत्तम प्रसार होईल.
ब्लॉग फेसबुकशी कसा जोडायचा!?
१. त्यासाठी सर्वप्रथम फेसबुक.कॉम वर जा. लॉग इन व्हा.
२. त्यानंतर उजव्या बाजूला वर Profile वर क्लिक करा.
३. आता Wall, Info वगैरे प्रोफाईलवर जो बार आहे ना! त्यात Notes सेक्शन आहे का ते पहा!? नसेल तर + चिन्हाचा वापर करुन तो जोडून घ्या.
टिप: वाईट बातमी ही आहे की, आत्ताच मी पाहिलं! नोट्स सेक्शन मधून ब्लॉग इम्पोर्ट करण्याचा पर्याय गायब झाला आहे. आणि चांगली बातमी ही आहे की, खूप शोध घेतल्यानंतर आडमार्गाने मला इम्पोर्ट करण्याचा डायरेक्ट दुवा सापडला आहे.
४. तर आता थेट या दुव्यावर जा. तिथे Import an External Blog नावाचे पान आहे.
५. Web URL:  च्या समोर एक रिकामी चौकट आहे , त्यासमोर आपल्या ब्लॉगचा पत्ता टाका अथवा आपल्या ब्लॉगच्या RSS/Atom फिडचा पत्ता टाका.
६. खालच्या लहान चौकटीत टिकमार्क करा आणि शेवटी Start Importing या बटणावर क्लिक करा.
७. आपला ब्लॉग आपल्या फेसबुक अकाऊंटशी जोडला गेला आहे. नोट्स सेक्शन मध्ये तो आपल्याला दिसू लागेल.
८. जर आपल्याला आपला फेसबुकशी जोडला गेलेला ब्लॉग हटवायचा असेल, तर Stop Importing वर क्लिक करा आणि आधिचे सारे पोस्ट डिलिट करा.
फेसबुकशी जोडण्यासाठी आपला स्वतःचाच ब्लॉग असावा असंही काही नाही. आपण आपल्याला आवडणारा ब्लॉग देखील फेसबुकशी जोडून त्यावरील प्रेम व्यक्त करु शकतो. 2know.in हा ब्लॉग जर तुम्हाला मनापासून आवडत असेल आणि तुमचा स्वतःचा असा ब्लॉग नसेल, तर तुम्ही 2know.in ला फेसबुकशी जोडू शकता. http://2know.in हा मुख्य पत्ता तर तुम्हाला माहितच आहे. आणि 2know.in च्या फिडचा पत्ता आहे http://feeds.feedburner.com/2knowin असा! मला वाटतं सर्वांनी एकदा हा प्रयत्न करुन पहायला हरकत नाही!
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.