आपल्या मोबाईलसाठी नवीन थिम कशी तयार कराल?

आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर एखादे छानसे वॉलपेपर ठेवणं सोपं आहे, पण अनेकांना हे माहित नसतं की, आपल्या मोबाईलसाठी एखादी छानसी थिम तयार करणंही अगदी सोपं आहे. त्यासाठी लागतात केवळ तुमच्या आवडीचे एक अथवा दोन वॉलपेपरस, फोटोज…आज मी तुम्हाला अशा दोन वेबसाईट्स बद्दल सांगणार आहे, ज्यांवर उपलब्ध असणा-या टुल्सचा वापर करुन तुम्ही अगदी सहजगत्या तुमच्या आवडीची वेबसाईट त्यार करु शकाता. एक आहे zedge.com आणि दुसरी आहे ownskin.com.

१.zedge.com : १. सर्वप्रथम zedge.com या वेबसाईटवर रजिस्टर व्हा. आणि तुमचा फोन निवडा.
२. त्यानंतर टुल्स (tools) वर क्लिक करा.
३. आणि मग सगळ्यात खाली असलेल्या थिम मेकर वर क्लिक करा.
४. Standby आणि background साठी तुमच्या आवडीचे दोन फोटोज अपलोड करा. आवश्यकता भासल्यास हवे तसे क्रॉप करा.
५. त्यानंतर थिमवर मेनूसाठी लिहिल्या जाणा-या अक्षरांचा रंग ठरावा.
६. हवं असल्यास थिम साठी एक रिंगटोन सेट करा.
७. आता त्या थिमला नाव देऊन ती डाऊनलोड करा.
८. zedge.com वापरुन थिम तयार करत असताना आपण अपलोड केलेल्या फोटोच्या दर्जानुसार (मेमरी बाबत) थिमचा दर्जा ठरतो. याबाबतीत zedge.com उजवा ठरतो.

२. ownskin.com : १. सर्वप्रथम ownskin.com वर रजिस्टर व्हा. आणि आपला मोबाईल फोन निवडा.
२. तुम्हाला तीन प्रकारचे थिम क्रिएटरस दिसून येतील. EXP+PRO, Professional आणि Express. त्यापॆकी कोणताही प्रकार तुम्ही निवडू शकता.
३. जलदगतीने थिम क्रिएट होण्यासाठी मी Express वर क्लिक करत आहे.
४. आता एखादा वॉलपेपर अथवा फोटो ऍड करुन त्याचा हवा तितका भाग सिलेक्ट करा.
५. आता हवा असल्यास आणखी एक फोटो निवडा. आणि Done वर क्लिक करा.
६.  आपल्या ईच्छेनुसार ऍडव्हान्स्ड सेटिंग्ज करा.
७. तुमच्या थिमला नाव वगॆरे द्या आणि ती सेव्ह करा.
८. ownskin.com वापरुन तुम्ही तुमच्या थिमला अधिक पर्सन्लाईझ करु शकता. याबाबतीत विचार करायचा झाल्यास ownskin.com अधिक चांगला थिम क्रिएटर आहे. पण आपण अपलोड केलेल्या फोटोच्या मेमरीनुसार थिमचा दर्जा ठरत नसल्याने कधीकधी थिमवरील चित्रे फिकट दिसू शकतात. पण तरीही हा एक अत्यंत चांगला असा थिम क्रिएटर आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.