इंग्लिश डिक्शनरी – एक उपयुक्त सॉफ्टवेअर

ज मी एका अत्यंतीक उपयुक्त अशा सॉफ्टवेअरची माहिती सांगणार आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे WordWeb 6.1 . हे सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करायलाच हवं. तुमचं इंग्रजी ब-यापॆकी असेल आणि आता ते तुम्हाला अधिक चांगलं करायचं असेल, तर त्यासाठी मी या सॉफ्टवेअरची खास शिफारस करेन.

खरं तर हे सॉफ्टवेअर मला योगायोगानेच सापडलं …नाहितरी इंटरनेटवर सारं काही योगायोगानेच सापडतं तो भाग वेगळा 🙂 …पण इंग्लिश शिकायची ज्याची मनापासून ईच्छा त्याच्यासाठी या सॉफ्टवेअरची उपयुक्तता ही खरंच वादातीत अशीच आहे. एडिटर्सनी या सॉफ्टवेअरला ५ स्टार्स दिले आहेत आणि बाकी सर्वसामान्या वापरकर्त्यांनीही याला ४.५ स्टार्स दिले आहेत. हे सॉफ्टवेअर वापरणं खूपच सोपं आणि मदतशील आहे. विशेष म्हणजे केवळ लहान मुलांसाठीच नाही तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये याची उपयुक्तता सिद्ध होते.

१. सर्वप्रथम वर्डवेब डिक्शनरी डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घ्या. (हे सारं करत असताना ते आपण रहात असलेला प्रदेश/खंड/उपखंड विचारतील, तेंव्हा आपला भारतीय उपखंड निवडावा. कारण असं केल्याने ते आपल्या ठिकाणी बोलल्या जाणा-या सोप्या इंग्रजी भाषेत एखाद्या शब्दाचा अर्थ सांगू शकतील.)
२. हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर संगणकाच्या उजवीकडे अगदी तळाला क्विक लाँच आयकॉन (नारंगी रंगावर निळा W) आपल्याला दिसून येईल. त्यावर क्लिक करा. 
३. Lookup च्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ हवा आहे तो शब्द टाईप करा आणी मग search वर क्लिक करा. उदा. मी Mind टाईप केले. अगदी उच्चारासहीत त्या शब्दाचे ‘विविध रंग’ तुमच्यासमोर उलगडले जातील. बाकी मला फार काही तांत्रिक बोलायची आवश्यकता नाही.
४. आता या डिक्शनरीची सर्वात मोठी उपयोगिता मी तुम्हाला सांगणार आहे.
* “वर्डवेब ओपन केल्यानंतर” इंटरनेट अथावा तुमच्या संगणकावरील कोणत्याही इंग्रजी शब्दावर तुमच्या माऊसचा कर्सर आणा आणि शिफ्ट दाऊब ठेवून माऊसवर राईट क्लिक करा. पहा! तुम्हाला तुमच्या शब्दाचा अर्थ मिळालेला असेल.

यानंतर परत कधी इंग्रजी लेख वाचता वाचता मध्येच एखादा शब्द अडला, तर तुम्हाला फार काही करण्याची आश्यकता नाही. केवळ शिफ्ट दाबून आपल्या माऊसवर राईट क्लिक करा आणि त्या शब्दाला समजून घ्या.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.