इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा मिळवा

पल्या मोबाईलमध्ये जर गाणी भरायची असतील, फोटो साठवायचे असतील, तर त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असणे आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे आपणास जर इंटरनेटवर आपले फोटो अपलोड करायचे असतील, फाईल्स साठवायच्या असतील, तर त्यासाठी देखील मेमरी कार्डप्रमाणे कुठेतरी आपली जागा असणं आवश्यक आहे. ही जागा आपणास इंटरनेटवरील विविध कंपन्या आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देतात. अशा खूप सार्‍या वेबसाईट्स आहेत आणि प्रत्येक वेबसाईट आपणास वेगवेगळ्या प्रमाणात फाईल्स साठवण्यास मोकळी जागा उपलब्ध करुन देत असते.

अशाच प्रकारे इंटरनेटवर मोफत जागा पुरवणारी एक नवीन साईट सध्या सुरु झाली आहे. या साईटचे सभासद झाल्यानंतर आपणास लगेच १५ जीबी मोफत मोकळी जागा मिळणार आहे. मी दिलेल्या लिंकवरुन जर आपण सभासद झालात, तर आपणास एकंदरीत २० जीबी मोफत जागा मिळेल. त्यानंतर आपण मित्रांना या साईटबद्दल सांगितलंत आणि ते या साईटचे सभासद झाले, तर तुम्हाला आणि तुमच्या मित्राला त्याबदल्यात प्रत्येकी ५ जीबी अतिरीक्त मोफत जागा मिळेल. अशाप्रकारे आपण कितीही लोकांना त्या साईटचे सभासद बनवून घेऊ शकाल. याचाच अर्थ दरवेळी जेंव्हा एखादा नवीन सदस्य तुमच्या मार्फत त्या साईटचा सदस्य होईल, तुम्हाला अतिरीक्त ५ जीबी जागा मिळेल. त्यामुळे आपण इंटरनेटवर या साईटच्या माध्यमातून किती मोफत जागा मिळवू शकाल? त्याला मर्यादा नाही. आपणास इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा मिळवता येईल. 

इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

या साईटचे नाव आहे “Copy”. ही साईट copy.com या इंटरनेट पत्यावरुन चालवली जाते. या साईटचा पत्ता पाहून तरी असं वाटतं की, ही साईट तयार करणार्‍यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे आणि ते आपल्या कामाबद्दल गंभीर आहेत. त्यांना आधिपासूनच प्रस्तापिथ अशा गूगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, स्काईड्राईव्ह, इत्यादी अग्रणी क्लाऊड स्टोअरेज साईट्सशी स्पर्धा करायची असल्याने मर्यादीत काळासाठी ते अशा अमर्याद स्पेसची सवलत आपणास देत आहेत. कॅमेर्‍याची प्रत दिवसेंदिवस जशी अधिकाधिक चांगली होऊ लागली आहे, तशी एका फोटोसाठी लागणारी मेमरी देखील वाढू लागली आहे. पण इकडे मेमरी साठवण्याचे दरही स्वस्त होऊ लागले आहेत. त्यामुळे क्लाऊड स्टोअरेज साईट्सही अधिक मोफत स्टोअरेज उपलब्ध करुन देऊ शकत आहेत.
मी देत असलेल्या या लिंक वरुन ‘कॉपी’ या साईटवर जा. आपण या लिंकवरुन गेलात तरच आपणास ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल. ‘कॉपी’ वर गेल्यानंतर त्या साईटवर आपले खाते उघडा. आता आपल्या ईमेल खात्यामध्ये लॉग इन करा. Copy कडून आपणास ‘Confirm your Copy account’ अशा विषयाचा एक नवीन ईमेल आला असेल. जर inbox मध्ये हा मेल आपणास सापडला नाही, तर एकदा आपले spam फोल्डर तपासा. हा ईमेल उघडून त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, म्हणजे आपल्या ‘कॉपी’ खात्याची पडताळणी (Verification) पूर्ण होईल. आता Copy चे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या, कारण त्याशिवाय आपणास आपले अतिरीक्त ५ जीबी मिळणार नाहीत. आपणास हे सॉफ्टवेअर नको असेल, तर ते नंतर लगेच `अन्‌इंन्स्टॉल’ (uninstall) केलंत तरी चालेल. 
इंटरनेटवर मोफत जागा
कॉपी – इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा
आपणास आपली २० जीबी मोफत जागा मिळाली असेल. आता आपणास याहूनही अधिक मोफत जागा मिळवायची आहे. त्यासाठी उजव्या बाजूला वर असलेल्या आपल्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा. इथे Invite Someone to Copy वर क्लिक करा. आपणास एक खास लिंक मिळेल ती आपल्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ट्विटरवर किंवा ईमेलने मित्रांसोबत शेअर करा. या लिंकवर क्लिक करुन जेंव्हा कोणी Copy या साईटचा मोफत सदस्य होईल आणि त्यांचे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर डाऊनलोड करेल, तेंव्हा आपणास  आणि त्यांस अशा दोघांसही प्रत्येकी ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल. कितीही लोकांना आपण अशाप्रकारे सदस्य करुन घेऊ शकाल. इंटरनेटर अमर्याद मोफत जागा मिळवण्याची ही एक संधी आहे, असं म्हणण्यास हरकत नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.